तरुण भारत

हाता पायाला मुंग्या येत आहेत

आपण दीर्घकाळ एकाच ठिकाणी बसून राहत असाल आणि हातापायांना मुंग्या येतात, काही वेळा बधीरपणा येतो. अर्थात हे लक्षण एखाद्या आजाराचे नाही. अशावेळी हातपाय हलवण्यास त्रास होतो. त्याचबरोबर शरिराच्या एखाद्या भागाला आतून मार लागला असेल तर मुंग्या येतात. आपल्या शरिराला सतत मुंग्या येणे ही बाब आरोग्यासाठी चांगली नाही. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. हात पायांना मुंग्या येण्यामागे अनेक कारणे असू शकतात.

 • रात्री एकाच अंगावर बराच काळ झोपल्याने पाय किंवा हात बधीर होतात, मुंग्या येतात. अशावेळी बधीर झालेल्या भागाला स्पर्शज्ञान राहत नाही. त्याचबरोबर हात आणि पाय योग्य रितीने हलवू शकत नाहीत. हातपाय थोडय़ावेळासाठी दुखतात. तेथे मालिश केल्यास किंवा पायावर पाय घासल्यास मुंग्या कमी होतात. पण मालीश करुनही उपयोग न झाल्यास ते एखाद्या आजाराचे कारण असू शकतात.
 • रक्तप्रवाह कमी झाल्यानेही हातपायांना मुंग्या येतात. शरीरात रक्तप्रवाह योग्य रितीने न झाल्यास त्याचा परिणाम रक्तपेशीवर पडतो. त्यामुळे शरीरातील विविध भागात ऑक्सिजन पुरेशा प्रमाणात पोचत नाही. परिणामी शरिरात मुंग्या येणे किंवा बधीरपणाची समस्या येऊ लागते.
 • शिरांसंबंधी आजार असेल तर हात पायांची बोटे किंवा सांधे बधीर होतात. अशा स्थितीत हात पायांना सुई टोचल्याचा भास होतो. काही वेळा हा त्रास असह्य होतो. अशा वेळी डॉक्टरकडे जाणे हिताचे ठरु शकते.
 • हाता-पायांना दीर्घकाळ मुंग्या येत असतील किंवा बधीरपणा येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करु नये. हे लक्षण कार्पल टनल सिंड्रोमचे असू शकते. मनगट आणि हात यात असणारी शीर दबल्याने बोटांना मुंग्या येऊ शकतात.

अन्य कारणे

Advertisements
 • सतत टाइप केल्याने : सतत टाइप केल्याने हातांना मुंग्या येऊ शकतात. मोबाईल, लॅपटॉप आणि संगणकावर बराचवेळ काम केल्याने मनगटाच्या शिरांवर वाईट परिणाम होतो.
 • शीर दबण्याचे कारण : कंबर किंवा मानेची नस दबली गेल्यासही पायाला मुंग्या येतात. याशिवाय मार लागल्याने देखील हात पायांना मुंग्या येतात. चुकीच्या पद्धतीने बसल्यानेही हाता-पायांना बधीरपणा येऊ शकतो.
 • मणक्याच्या हाडांना इजा झाल्यास जवळच्या शिरांवर ताण पडतो. यात सव्हाईकलची समस्या उदभवते. परिणामी हात पाय बधीर होतात.
 • काही गर्भवतींना पायांत मुंग्या येण्याचा त्रास होतो. ज्या महिलांचे तळवे सपाट असतात, त्यांच्या पायाच्या शिरावर ताण आल्याने ही समस्या जाणवते.
 • मधुमेहामुळे देखील हात-पायांना मुंग्या येऊ शकतात. अशा वेळी रक्तातील साखर तपासयला हवी.
 • हात-पाय आखडणे, मुंग्या येणे ही कारणे थॉयराईडची देखील असू शकतात. थॉयराईड ग्रंथीत बिघाड झाल्यास हात-पाय बधीर होतात. अशा वेळी तातडीने डॉक्टरचा सल्ला घ्यावा आणि रक्त तपासावे.
 • जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळेही हातापायांना मुंग्या येतात. व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे हात पाय बधीर होण्याचा त्रास सुरू होतो. अशा वेळी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण जीवनसत्त्वच्या गोळ्या घेऊ शकतात.

Related Stories

प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी…

Omkar B

स्मरणशक्ती आणि पुरेशी झोप

Omkar B

ट्रेडमिलवर धावताना…

Omkar B

लठ्ठपणा आणि मूग

tarunbharat

वरुण मुद्रा

Omkar B

व्हिटॅमिन सी का गरजेचे

Amit Kulkarni
error: Content is protected !!