तरुण भारत

नखे खाताय

नखे खाण्याची सवय अनेकांना लहानपणापासून असते आणि वयानुसार ती सवय वाढत जाते. कालांतराने ही सवय आयुष्यभर राहते. परंतु त्याकडे वेळीच लक्ष देण्याची गरज आहे. 

नखे का खाल्ली जातात?

  • कंटाळवाणे वाटत असेल किंवा नैराश्य आले असेल तर नख खाण्याच्या सवयीतून आपण स्वतःला बिझी ठेवतो. जेव्हा आपण संपूर्ण एकाग्रतेने काम करतो, तेव्हा या सवयीची आठवण होत नाही. नख खाल्ल्याने भीती, चिंता यापासून काही वेळ सुटका मिळू शकते. काही प्रमाणात ही सवय लागण्यामागे एडीएचडी, डिप्रेसिव्ह डिसऑर्डर, ओसीडी आणि अँक्झायटी डिसॉर्डर यासारखी कारणे असू शकतात.

तोटे काय आहेत?

  • नख खाण्याच्या सवयीमुळे आपल्याला त्वचा आणि तेथील भागाचे नुकसान होऊ शकते. या सवयीमुळे नखाजवळ दुखणे सुरू होऊ शकते. बोटाच्या माध्यमातून तोंडात बॅक्टेरिया जाण्याची भीती राहू शकते आणि फंगल इंफेक्शन होऊ शकते. नख खाल्याने पोट आणि आतडय़ांना संसर्ग होण्याचा धोका राहतो.

सवय कशी सोडायची?

  • एखादी सवय मोडण्यासाठी आपल्याला बराच काळ लागतो. त्याचप्रमाणे नख खाण्याची सवय सोडताना देखील संयम बाळगणे गरजेचे आहे. काही टिप्सच्या आधारे नख खाण्याची सवय सोडू शकता.
  • नियमित नखे कापा : असे केल्यास कुरतडण्यासाठी नखेच राहणार नाहीत.
  • नेल पॉलिश वापराः  नेलपॉलिश लावलेले नख तोंडात गेले तर वेगळीच चव लागू शकते. त्यामुळे आपोआपच नख खाण्याची सवय सोडून देऊ शकतो.
  • हातमोजे वापरा : हा उपचार तात्पुरता आहे. आपण कापडी हातमोजे वापरु शकतो. त्यामुळे नख खाण्याची सवय सुटू शकते.

Related Stories

वर्कआउट नंतर प्रोटीन खाताय

Amit Kulkarni

चहा आणि कोरोना

Omkar B

समस्या ऱ्हुमेटॉइड आर्थ्रायटिसचा

tarunbharat

भ्रूणाच्या नाळेत ‘मायक्रोप्लास्टिक’

Omkar B

जपावे दंत आरोग्य

Omkar B

हृदयविकाराच्या धक्क्याची पूर्वसूचना देणार एक्सरे

Patil_p
error: Content is protected !!