तरुण भारत

भाईगिरीची हवा डोक्यात तरुणाई गुन्हेगारीच्या विळख्यात

आशिष आडिवरेकर / कोल्हापूर

 `वास्तवा’चे भान विसरुन कल्पक जगात वावरणारी तरुणाईची पावले सध्या अल्पावधीत श्रीमंतीकडे वळली आहेत. गुंडगिरी, भाईगिरी, वर्चस्ववादाची डोक्यात गेलेली हवा. तरुणाईवर चार भिंतीच्या आतील कारागृहाची हवा खाण्याची वेळ आणत आहे. तरुणांचा गंभीर गुह्यातील वाढता सहभाग चिंताजनक बनत चालला आहे. कारागृहात असणाऱया एकूण बंदीजनांपैकी 50 टक्के तरुण 30 वर्षाच्या आतील असल्याची धक्कादायक माहिती आकडेवारीवरुन समोर आली आहे.

Advertisements

तरुणाईच्या हातामध्ये देशाचे भवितव्य आहे. पण तिच तरुणाई सध्या गुन्हेगारींच्या विळख्यात अडकल्याचे चित्र आहे. कळंबा कारागृहात सध्या 2450 बंदीजन आहेत. 41 महिला कैदी आहेत. तर 450 हून अधिक कैदी पॅरोलवर बाहेर आहेत. कारागृहातील उर्वरीत बंदीजनांपैकी 50 टक्के बंदीजन हे 30 वर्षाच्या आतील आहेत. तस्करी, मटका, गांजा, मोबाईल चोरी, चेन स्नॅचिंग, घरफोडी अशा अनेक गंभीर गुह्यांमध्ये तरुणांचा समावेश सध्या वाढत आहे. याचसोबत वर्चस्ववाद, भाईगिरी, गुंडगिरी, अपहरण, खंडणीसह अनेक प्रकरणांमध्येही तरुणांचा सहभाग वाढत आहे. शहरात कार्यरत असणाऱया अनेक टोळ्यांमध्ये तरुणांचा भरणा मोठÎा प्रमाणात आहे. वास्तवाचे भान विसरुन अलिशान मोटारी, किंमती मोबाईल हाय प्रोफाईल राहणीमानाच्या आभासी दुनियेच्या मागे तरुणाई लागून त्यांची पावले सध्या गुन्हेगारीकडे वळत आहे. जिह्यात घडलेल्या अनेक गंभीर घटनांमध्ये तरुणांचा सहभाग वाढल्याचे दिसून येत आहे. पाचगांव येथील खून प्रकरण, तसेच टेंबलाईवाडी येथील डबल मर्डर प्रकरणातील आरोपी हे तरुण आहेत. त्यांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या दोन घटनांमुळे तरुणांचा गुन्हेगारीतील वावर आणि त्यानंतर त्यांच्या आयुष्याची वाताहत अधोरेखीत करत आहे. 

कुटूंबे उद्धवस्त

सुड भावना, वर्चस्ववाद, तसेच तस्करीसह अनेक गंभीर गुह्यांमध्ये सध्या 30 वर्षाच्या आतील तरुणांचा सहभाग वाढत आहे. यामुळे अनेक कुटूंबे उद्धस्त झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहेत. संबंधीतांना या गुह्यांमध्ये कारागृहाची हवा खावी लागते. मात्र यानंतर त्याच्या कुटूंबाला मात्र अनेक हाल, अपेष्टांना सामोरे जावे लागते. यामुळे अनेक कुटूंबे उद्धस्त झाली आहेत. तर अनेकांनी जिल्हा सोडून जाणे पसंत केले आहे.

अल्पवयीन आरोपींचाही टक्का वाढला

मोबाईल, दुचाकी, चेन, मंगळसुत्र, पर्स चोरीमध्ये सध्या अल्पवयीन आरोपींचा टक्का वाढला आहे. अल्पवयीन आरोपींना कायद्याच्या मिळणाऱया संरक्षणाचा फायदा काही टोळकी घेत आहेत. त्यांना सुधारगृहात पाठवल्यानंतर त्यांच्या कुटूंबाला आर्थिक रसद पुरवण्याचे काम हे म्होरके करतात. यामुळे अल्पवयीनांची पावले गंभीर गुह्याकडे वळू लागली आहेत.

वयोगटानुसार कारागृहातील बंदीजनांची संख्या

18 ते 30   ः 980

31 ते 50   ः 829

51 वर्षावरील ः 150

तरुणांचा सहभाग असणाऱया काही ठळक घटना

– अवधुत माळवी खून प्रकरण

– पाचगांव येथील अशोक पाटील, धनाजी गाडगीळ खून प्रकरण

– टेंबलाईवाडी डबल मर्डर प्रकरण

– पोलीसांनी उद्धवस्त केलेल्या मटका रॅकेटमध्ये अनेक तरुणांचा सहभाग

– मोक्याच्या कारवाईमध्ये बहुतांशी तरुणांचा सहभाग

– राहूल चव्हाण, भास्कर खून प्रकरण

– सुरेश पवार, पांडू पवार खून प्रकरण

– कसबा बावडा येथील आंतरजातीय विवाहातून झालेला डबल मर्डर

तरुणांना मार्गदर्शनाची गरज

धावत्या जगात तरुणाईवर असणारी बंधने सध्या कमी झाली आहेत. ज्येष्ठ व्यक्ती, शिक्षक यांचा असणारा आदरपुर्वक धाक उरला नाही. कमी वेळेत हातात मिळणारा पैसा, उच्च राहणीमान याच्या मागे धावणाऱया तरुणाईची पावले गुन्हेगारीकडे वळत आहेत. भविष्याचा गांभीर्याने विचार न केल्यामुळे तरुणांवर पश्च्यातापाची वेळ येत आहे. तरुण व ज्येष्ठांमध्ये पोकळी निर्माण झाल्यामुळे मार्गदर्शन कमी पडत आहे. हे मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. – प्रा. डॉ. भरत नाईक, मानशास्त्र विभाग प्रमुख महावीर कॉलेज

पालकांनी मुलांशी संवाद वाढवणे आवश्यक

योग्य वेळी न मिळालेले मार्गदर्शन, एकटेपण यातून मुलांमध्ये नैराश्य भावना वाढते. यातच क्षणीक रागातुन तरुणांच्या हाती एखादी चुक होते आणि त्याचा पश्च्याताप मात्र त्यांना आयुष्यभर राहतो. यामुळे तरुणांनी शालेय जिवनापासूनच आपले ध्येय ठरवून त्या दृष्टीने योग्य वाटचाल करावी. –शैलेश बलकवडे, जिल्हा पोलीस अधिक्षक

Related Stories

एक महिना झोप काढला काय?

Abhijeet Shinde

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची संततधार कायम, पंचगंगेची वाटचाल इशारा पातळीकडे

Abhijeet Shinde

जिल्हय़ातील १४ मार्ग बंद, पर्यायी मार्गाने वाहतुक सुरू

Abhijeet Shinde

…अखेर नगरसेवकांनी ‘त्या’ कापडी पिशव्या वाटल्या

Abhijeet Shinde

मुंबईत मराठा आंदोलन होणारच

Abhijeet Shinde

ट्रकची दुचाकीस जोराची धडक,पत्नी जागीच ठार तर पती गंभीर जखमी

Abhijeet Shinde
error: Content is protected !!