तरुण भारत

पंजाबमध्ये कोरोनाबाधितांनी ओलांडला 1.88 लाखांचा टप्पा

  • रविवारी 1,051 नवे कोरोना रुग्ण ; 17 मृत्यू 

ऑनलाईन टीम / चंदीगड : 


पंजाबमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसत आहे. रविवारी एक हजार पेक्षा अधिक रुग्ण आढळून आले. मागील 24 तासात 1,051 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 17 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे पंजाबमधील कोरोना बाधितांची एकूण संख्या 1 लाख 88 हजार 391 इतका झाला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.  

Advertisements


मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 1,88,391 रुग्णांपैकी 1 लाख 74 हजार 967 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 5 हजार 927 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

  • 7 हजार पेक्षाअधिक रुग्ण ॲक्टिव्ह  


ताज्या आकडेवारी नुसार, पंजाबमध्ये आतापर्यंत जवळपास 51 लाख 90 हजार 528 टेस्ट करण्यात आल्या आहेत. सद्य स्थितीत 7 हजार 497 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील 143 रुग्णांना अक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. तर 14 जण व्हेंटिलेटरवर आहेत. 

Related Stories

महाआघाडीची 126 जागांवर आघाडी

datta jadhav

केरळचे मुख्यमंत्री कोरोना पॉझिटिव्ह

Patil_p

मुस्लीम कुणाचेच गुलाम नाहीत : ओवैसी

Omkar B

ब्लॅक फंगसवरील इंजेक्शन मिळणार 1,200 रुपयात

Amit Kulkarni

दहशतवाद्यांचा कट उधळला

Amit Kulkarni

आता हैदराबादमधील 8 सिंहांना कोरोनाची लागण!

pradnya p
error: Content is protected !!