तरुण भारत

सर्वात क्रूर महिला 17 वर्षांनी निघाली निर्दोष

4 मुलांच्या मृत्यूमागे नैसर्गिक कारण – वैज्ञानिकांकडून माफी देण्याची मागणी

वृत्तसंस्था/ कॅनबरा

Advertisements

ऑस्ट्रेलियात मुलांची मारेकरी म्हणून दोषी ठरलेल्या कॅथरिन फॉलबिगला माफी देण्याची मागणी आघाडीचे वैज्ञानिक आणि वैद्यकीय तज्ञांनी केली आहे. तिची चारही मुलं नैसर्गिक कारणामुळे मृत्युमुखी पडली असण्याची शक्यता असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 2003 साली कॅथरिना यांना 19990 ते 1999 या दरम्यान मुलांना ठार केल्याप्रकरणी दोषी ठरविण्यात आले होते. तसेच तिला ‘ऑस्ट्रेलियाज वर्स्ट फिमेल सीरियल किलर’ संबोधिण्यात आले होते.

फॉलबिग निर्दोष असू शकते असे 90 वैज्ञानिक आणि वैद्यकीय तज्ञांच्या समुहाचे मत आहे. फॉलबिग यांची मुले दुर्मीळ जेनेटिक म्युटेशन्समुळे मृत पावलेली असू शकतात. न्यायप्रदानातील चुकीमुळे फॉलबिग यांना भोगावा लागणारा त्रास आता थांबवावा अशी विनंती या समुहाने न्यू साउथ वेल्सचे गव्हर्नर मार्गारेट बीझली यांना केली आहे. या समुहाने फॉलबिग यांच्या चारही मुलांचे जिनोम सीक्वेसिंग केल्यावर यासंबंधी भूमिका मांडली आहे. कॅथरिन यांच्या दोन मुलांमध्ये जेनेटिक म्युटेशन झाले होते आणि यातूनच त्यांचा मृत्यू ओढवला असावा असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे.

कॅथरिन फॉलबिग कोण?

53 वर्षीय फॉलबिग यांना 2003 साली 7 आठवडय़ांच्या सुनावणीनंतर अटक करण्यात आली होती. कॅलेब, पॅट्रिक, सारा आणि एलिझाबेथ या स्वतःच्या अपत्यांची नैराश्यातून 10 वर्षांच्या कालावधीत हत्या केल्याचा त्यांच्यावर आरोप होता. 1991 मध्ये 8 महिन्याच्या पॅट्रिकचा मृत्यू झाला होता. सारा, कॅलेब या 10 महिन्यांच्या अपत्याचा 1999 मध्ये मृत्यू झाला होता. 1991 मध्ये 19 महिन्यांच्या एलिझाबेथचा मृत्यू झाला होता. या चारही जणांच्या मृत्यूचे निश्चित कारण समजू शकले नव्हते. फॉलबिग यांनी नेहमीच निर्दोष असल्याचा दावा केला होता. परिस्थितीजन्य पुराव्यांवर तिला दोषी ठरविण्यात आले होते. विशेषकरून डायरीतील तिच्या नोंदी याकरता कारणीभूत ठरल्या होत्या. 2019 मध्ये न्यू साउथ वेल्स प्रशासनाने फॉलबिग समर्थकांकडून दाखल अर्जानंतर चौकशीची घोषणा करत तिच्या शिक्षेला स्थगिती दिली होती.

Related Stories

ब्राझीलमध्ये कोरोनाने घेतले 2.5 लाख बळी

datta jadhav

निर्बध शिथिल

Patil_p

मेक्सिकोत बाधितांनी गाठला 10 लाखांचा टप्पा

datta jadhav

ऑस्ट्रेलियाच्या संसदेत महिलेवर बलात्कार

Patil_p

विमानसेवा रोखली

Patil_p

कोरोना, हिवाळा प्रदूषणाचा तिहेरी मारा

Patil_p
error: Content is protected !!