तरुण भारत

मोटो जी 30 व 10 पॉवर आज होणार लाँच

किंमती 13 ते 16 हजाराच्या घरात

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisements

मोटोरोला कंपनीचे बहुप्रतिक्षीत असलेले दोन स्मार्टफोन्स लवकरच बाजारात दाखल होणार आहेत. फोन कधी येणार याची उत्सुकतेने वाट पाहणाऱयांना दिलासा मिळाला असून सदरचे दोन स्मार्टफोन्स 9 मार्च रोजी लाँच केले जाणार असल्याचे सांगितले आहे.

सदरचे मोटो जी 30 आणि मोटो जी 10 पॉवर हे स्मार्टफोन्स युरोपच्या बाजारात दाखल करण्यात आले आहेत. सदरचे फोन खरेदीसाठी फ्लिपकार्टवर उपलब्ध करण्यात आले आहेत. सदरच्या फोनचे डिझाइन फ्लिपकार्टवर प्रदर्शित केले असल्याचे समजते. मोटो जी 30 ची किंमत अंदाजे 15 हजार 900 रुपये तर मोटो जी 10 ची किंमत 13 हजार 300 रुपये असणार आहे. युरोपपेक्षा भारतात सदरचे फोन रास्त किमतीला उपलब्ध करण्यात येणार आहेत. जी 30 फोन पेस्टल स्काय व फँटॉम ब्लॅक व जी 10 ऑरोरा ग्रे व इरीडीसेंट पर्ल या दोन रंगात मिळणार आहेत. सदरच्या फोनबाबत सविस्तर माहिती मात्र कंपनीने दिलेली नाही. 

 या सुविधा असतील….

तरीही मिळालेल्या माहितीनुसार मोटो जी 30 मध्ये 6.5 इंच एचडी डिस्प्ले, वॉटरड्रॉप नॉच या सुविधा तर जी 10 मध्ये स्नॅपड्रगन 662 एसओसी, 6 जीबी रॅम व 128 जीबी अंतर्गत साठवणुकीची क्षमता अशा सुविधा आहेत.

Related Stories

स्मार्टफोन्समध्ये जिओमार्टचे स्थान मजबूत

Patil_p

व्होडाफोन आयडियाची यशस्वी वेगवान 5 जी चाचणी

Patil_p

विवो वाय 20 लवकरच भेटीला

Patil_p

व्होडाफोन-आयडियाचे स्वस्त प्लॅन सादर

Patil_p

ओप्पो एफ 19 भारतात लाँच

Patil_p

…विवोचा ‘वाय 1 एस’ स्मार्टफोन सादर

Patil_p
error: Content is protected !!