तरुण भारत

अरुणाचल प्रदेशात दिसले दुर्लभ सोनेरी बदक

मुख्यमंत्री पेमा खांडूही झाले थक्क

पश्चिम युरोप आणि अमेरिकेतील स्थलांतरित पक्षी मंदारिन बदक अलिकडेच अरुणाचल प्रदेशात दिसून आला आहे. याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी एक चित्रफित ट्विट करत दिली आहे. या सोनेरी बदकाला पाहून खांडूही थक्क झाले आहेत.

Advertisements

मंदारिन बदक ईस्ट प्लेर्कटिकमधील मूळ परचिंग बदकाची एक प्रजाती असून ज्याला चालू आठवडय़ाच्या प्रारंभी अरुणाचल प्रदेशमध्ये पाहिले गेले आहे. या बदकाची चित्रफित वन आणि पर्यावरण मंत्रालयानेही ट्विटरवर प्रसारित केली आहे.

18 सेकंदांच्या या चित्रफितीत मंदारिन बदक तलावातील अन्य बदकांसोबत पोहत होते. पश्चिम युरोप आणि अमेरिकेतील स्थलांतरित बदकाने अरुणाचल प्रदेशातील दिरंग खोऱयानजीकच्या मोनपास येथे धाव घेतली असून तेथे वन विभाग आणि स्थानिक लोकांनी त्याच्या संरक्षणासाठी विशेष तयारी केली आहे.

सोनेरी बदक पाहून अत्यंत आनंदी झालो आहे. संरक्षणाचे प्रयत्न आता यशस्वी ठरू लागले आहेत. मंदारिन बदक जगात सर्वाधिक सुंदर मानले जाते. यापूर्वी हा बदक सीखे सरोवरानजीक तर आता दिरांग खोऱयातील मियोंग नदीत दिसून आल्याचे उद्गार मुख्यमंत्री खांडू यांनी काढले आहेत.

मंदारिन बदकाची पजाती पूर्व आशियात फैलावलेली होती, पण दीर्घ प्रमाणात निर्यात आणि जंगलतोड झाल्याने त्यांची संख्या कमी झाली. पूर्व रशिया आणि चीनमध्ये यांची प्रजाती खूपच कमी झाली आहे. आता या बदकाच्या 1 हजारपेक्षा कमी जोडय़ा शिल्लक राहिल्या आहेत.

Related Stories

डॉक्टरांचा आज देशव्यापी संप

Patil_p

गुजरातमधील 3 कंपन्यांशी ‘भारत बायोटेक’चा करार

Patil_p

कर्नाटकात नवीन कोरोना रुग्णसंख्येत घट

triratna

अध्यक्षासंबंधी वेळच ठरविणार!

Patil_p

रा. स्व. संघाच्या मुस्लीम शाखेकडून निधी संकलन

Patil_p

पंतप्रधान मोदी २४ ऑक्टोबर रोजी देशवासियांशी साधणार ‘मन की बात’

triratna
error: Content is protected !!