तरुण भारत

रुग्णालय स्वच्छता कामासाठी मुदत वाढ

सावंतवाडी रुग्णालय प्रशासनाकडून ‘तरुण भारत’च्या वृत्ताची दखल

सावंतवाडी:

Advertisements

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात सफाई कर्मचाऱयांअभावी अस्वच्छतेत वाढ झाल्याचे वृत्त ‘तरुण भारत’मध्ये प्रसिद्ध होताच आरोग्य प्रशासनाने तात्काळ दखल घेत. संबंधित ठेकेदाराला एक महिन्याची कामाची मुदत वाढ दिली आहे. त्यामुळे सध्यास्थितीत कंत्राटी कामगारांना दिलासा व कायमस्वरुपी सफाई कर्मचाऱयांवरील अतिरिक्त कामाचा ताण दूर झाला आहे. याप्रश्नी सामाजिक कार्यकर्ते व जीवनरक्षा वैद्यकिय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसूरकर यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांच्याशी संपर्क साधून प्रयत्न केले. याबाबत संबंधित ठेकेदार व सामाजिक कार्यकर्त्या अपर्णा कोठावळे यांचेशी संपर्क साधला असता आरोग्य प्रशासनाने रुग्णालयाच्या अस्वच्छतेअभावी होणाऱया समस्येबाबत व रुग्णांना होणाऱया त्रासबाबत जिल्हा आरोग्य प्रशासनाने 31 मार्चपर्यंत एक महिना कामाची मुदत वाढ मंजुरी दिली आहे. त्यानुसार 6 मार्चपासून पूर्णवत कंत्राटी कामगार सेवेत दाखल करून कामाची सुरुवात केली आहे. ही एक महिन्याची मुदत संपल्यानंतर 1 एप्रिलपासून नव्याने कंत्राटी सफाई कामगारांची निविदा काढली जाईल, असे लेखी पत्रकात नमूद केल्याचे अपर्णा कोठावळे यांनी माहिती दिली.

गेल्या 28 फेब्रुवारीपासून सौ. कोठावळे यांच्या कंत्राटी कामाची मुदत संपल्याने काम बंद ठेवले होते. त्यामुळे याचा फटका आठ कंत्राटी सफाई कामगारावर उपासमारीची वेळ आली. तर या स्वच्छतेचा अतिरिक्त कामाचा ताण कायमस्वरुपी काम करणाऱया दोन कामगारांवर पडला होता. त्यामुळे रुग्णालयात अस्वच्छतेत वाढ झाली होती. हे वृत्त ‘तरुण भारत’मध्ये 4 मार्च रोजी प्रसिद्ध झाले होते. त्या वृत्ताची दखल सामाजिक कार्यकर्ते राजू मसूरकर यांनी उचलून धरत जिल्हाशल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांच्याशी संपर्क साधून चर्चा केली तसेच ठेकेदार सौ. कोठावळे यांनीही आरोग्य प्रशासनाकडे पाठपुरवठा केला होता. सध्यास्थितीत हा प्रश्न सुटला असून पुढील निविदा मार्च महिना संपण्यापूर्वी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

Related Stories

पांढऱया चिपीचे होणार जतन, संरक्षण!

Patil_p

साटेली भेडशीत पहिल्याच पावसात गटार तुंबले

NIKHIL_N

नागरिकांना जीवनाश्यक वस्तूंचे वाटप

Patil_p

ओटवणे येथील रहिवासी रामचंद्र परब यांचे निधन

Ganeshprasad Gogate

सुरक्षारक्षकाअभावी पाळंदेत पर्यटकांची

Patil_p

नव्याने 15 पॉझिटिव्ह, 35 कोरोनामुक्त

NIKHIL_N
error: Content is protected !!