तरुण भारत

काठेवाडी घोडय़ावरती पुढय़ात घ्या हो मला

ऐकावं ते नवलच. पाठीचा कणा शाबूत रहावा, त्याला वेदना होऊ नयेत म्हणून माझ्या महाराष्ट्रातील कोणा सनदी अधिकाऱयाने कचेरीत घोडय़ावर बसून यायचे ठरवले आहे. त्यासाठी त्याने वरि÷ांना पत्र लिहून परवानगी मागितली आहे. फार पूर्वी कोणा अन्य अधिकाऱयांनी थेट मुख्यमंत्र्यांना विषय अवगत केला होता. तसे या अधिकाऱयांनी केलेले नाही. त्यांनी घोडय़ावरून येण्याची परवानगी मागितली आहे. घोडय़ाच्या पार्किंगची सुविधा मिळावी म्हणून अर्ज केला आहे.

ऐतिहासिक सिनेमात काम करणाऱया आणि राजकीय विषयांवर ट्विट करणाऱया एका महान अभिनेत्रीने लाकडी घोडय़ावर बसून चित्रपटातली रोमहर्षक दृश्ये चित्रित करविली होती. उपरोक्त अधिकारी खऱया घोडय़ावर बसून येणार की अशा लाकडी घोडय़ावर बसून येणार हे बातमीत स्पष्ट झालेले नाही. लाकडी घोडय़ावर बसून आले तर हरकत नाही. लाकडी घोडा स्वस्त पडेल. कारण तो चारा खात नाही. पाणी पीत नाही. इतर देहधर्म देखील पार पाडीत नाही.  पण नंतर त्या अभिनेत्रीताईंप्रमाणे सरकारवर टीका करणारे ट्विट टाळावेत अशी सरकारची अपेक्षा असणार.

Advertisements

लहान मुलांच्या खेळण्यात आणखीन एक प्रकारचा लाकडी घोडा असतो. त्यावर बसून कितीही प्रयत्न केला तरी तो जागच्या जागी झुलतो. जास्तीत जास्त एखादा इंच पुढे सरकतो. नाहीतर मागेच येतो. त्याला सरकारी फायलींची उपमा द्यायचे कारण नाही. पण तो घोडा जागचा हलत नसल्याने उपरोक्त सरकारी अधिकाऱयांच्या कामाचा नाही.

निवडणुकीत त्रिशंकू अवस्था आणणारे निकाल लागले तर घोडेबाजार भरतो असे म्हणतात. उपरोक्त अधिकाऱयांना त्या बाजारातले घोडे चालणार नाहीत किंवा परवडणारच नाहीत.   

उपरोक्त अधिकारी घोडा वापरू लागले की इतर अधिकारी, कनि÷ सहकारी त्यांचे अनुकरण करू शकतील. दुचाकी बनवणाऱया कंपन्या घोडे विक्रीत उतरतील. पूर्वी सरकारी बाबू हपिसात आले की मस्टरवर सही करून खुर्चीवर आपला कोट लटकावून तास न् तास गायब होत. आता खुर्चीवर कोटाऐवजी घोडय़ाचे खोगीर ठेवून बाबू लोक गायब होऊ शकतील. वपुंच्या एका कथेत नायक शेजारणीला स्कूटरवर लिफ्ट देतो आणि घरी महाभारत घडते. आता काठेवाडी घोडय़ावरती कोणी कोणाला लिफ्ट दिली तर लिफ्ट घेणारी व्यक्ती घोडेस्वारांच्या मागे बसते की गदिमांच्या लावणीप्रमाणे पुढय़ात बसते बघून वपुंच्या कथेचा रिमिक्स लिहिता येईल.

Related Stories

काही हरकत नाही

Patil_p

शतधन्व्याचा वध

Patil_p

विनायक खेडेकरांना पद्मश्री… गोव्याचाही सन्मान!

Patil_p

खाशाबांचे वारस घडवा!

Patil_p

बलराम मिथिला नगरीत

Patil_p

दहावीत उत्तीर्ण केले पण पुढचे काय?

Patil_p
error: Content is protected !!