तरुण भारत

7 वर्षांमध्ये गॅस सिलिंडरचा दर दुप्पट

पेट्रोल-डिझेलवरील करसंकलन 459 टक्क्यांनी वाढले

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisements

मागील 7 वर्षांमध्ये गॅस सिलिंडरची किंमत दुप्पट होऊन 819 रुपये झाल्याची माहिती पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सोमवारी दिली आहे. तर डिझेल-पेट्रोलवरील करसंकलनात 459 टक्क्यांची वाढ झाल्याचे प्रधान यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरादाखल सांगितले आहे.

1 मार्च 2014 रोजी 14.02 किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 410.5 रुपये होती. तर आता याच सिलिंडरची किंमत 819 रुपये झाली आहे. मागील काही वर्षांमध्ये किमतीत झालेल्या वाढीमुळे घरगुती सिलिंडर आणि पीडीएस केरोसिन ऑइलवरील अनुदानही संपुष्टात आल्याचे प्रधान म्हणाले.

घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती मागील काही महिन्यांमध्ये वाढल्या आहेत. डिसेंबर 2020 मध्ये याची किंमत 594 रुपये होती, जी आता 819 रुपये झाली आहे. अशाप्रकारे गरिबांना पीडीएसद्वारे विकण्यात येणारे केरोसिन ऑइल मार्च 2014 मध्ये 14.96 रुपयांमध्ये प्रतिलिटर मिळत होते, जे आता 35.35 रुपये झाल्याचे प्रधान यांनी म्हटले आहे.

देशात डिझेल-पेट्रोलचे दरही उच्चांकी स्तरावर आहेत. प्रत्येक राज्यात यावरील मूल्यवर्धित कर आणि शुल्क वेगवेगळे आहेत. दिल्लीत सध्या पेट्रोल 91.17 रुपये लिटर तर डिझेल 81.47 रुपये प्रतिलिटर झाले आहे. 2013 मध्ये डिझेल-पेट्रोलवर 52,537 कोटी रुपयांचा कर प्राप्त होत होता. 2019-20 मध्ये हा आकडा 2.13 लाख कोटी रुपये झाला आहे. तर चालू आर्थि वर्षाच्या पहिल्या 11 महिन्यांमध्ये 2.94 लाख कोटी रुपयांचा कर जमा झाला आहे.

Related Stories

शेततळ्यात बुडून मार्डीत तीन मुलींचा मृत्यू

Sumit Tambekar

कृषी पायाभूत सुविधांसाठी 1 लाख कोटींच्या योजनेची मोदींकडून घोषणा

datta jadhav

पीएम मोदींची ऑलिम्पिकवीरांसोबत ‘चाय पे चर्चा’

Abhijeet Shinde

कुलगाम चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

prashant_c

सांगली-कोल्हापूर एसटी हाऊसफुल्ल

Sumit Tambekar

यंदा जाणवणार कडाक्याची थंडी

Patil_p
error: Content is protected !!