तरुण भारत

ज्ञानप्रसारक कॉलेजमध्ये पुस्तक प्रदर्शन

प्रतिनिधी / म्हापसा

पुस्तके माणसाच्या जीवनात खूप महत्त्वाचे काम करतात. विशेष करुन विद्यार्थ्यांच्या जीवनात पुस्तकाचे महत्त्व खूप जास्त आहे. पुस्तके आपले मित्र आहेत. ती जीवनातल्या चांगल्या गोष्टींसाठी प्रेरणा देतात आणि अपयशावर मात करण्यास शिकवितात. बऱयाचदा अनेक गोष्टी आपण पुस्तकातूनच शिकतो. प्रत्येकाने कामाबरोबरच वाचनाची सवय लावली तर पुष्कळ गोष्टी शिकता येईल. वाचनाने विचारांची क्षितीजे उंचावतात आणि जास्त ज्ञान मिळवण्याची तहान भागते. याचे महत्त्व लक्षात घेऊन आसगांव येथील ज्ञानप्रसारक मंडळाच्या महाविद्यालय आणि संशोधन केंद्राच्या वाचनालयाने पुस्तक प्रदर्शनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.

Advertisements

 फोंडय़ातील पुस्तक वितरक ‘बुकमेट’ यांनी विविध विषयांवरील वेगवेगळ्या प्रकाशकांची पुस्तके प्रदर्शनात मांडली. त्याचबरोबर प्रेरणादायी व प्रसिद्ध व्यक्तिंच्या चरित्र्यावरील पुस्तकेही मांडण्यात आली.

सदर पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन ज्ञानप्रसारक मंडळाच्या महाविद्यालय आणि संशोधन केंद्राचे प्राचार्य प्रोफेसर डी.बी. आरोलकर यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाच्या विविध विभागांचे प्राध्यापक उपस्थित होते. महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ. जयप्रकाश यांनी ग्रंथालयाच्या कर्मचाऱयांसह सदर प्रदर्शनाचे आयोजन केले.

Related Stories

सर्वांच्या नजरा सर्वोच्च न्यायालयाकडे

Amit Kulkarni

फोंडा तालुक्याला चक्री वादळाचा तीव्र झटका

Omkar B

दिपोत्सवातून सण उत्सवाची परंपरा शिकून घ्या

Patil_p

कुंकळ्ळी, बाळ्ळी, फातर्पा परिसरांत विजेचा लपंडाव

Omkar B

डॉ चंद्रकांत शेटय़े यांचा वाढदिवस साजरा

Omkar B

वाहतूक कार्यालये, ढाबे ‘स्कॅनर’खाली येणे गरजेचे

Omkar B
error: Content is protected !!