तरुण भारत

राष्ट्रीय जनता दल गोवाच्या अध्यक्षाचा राजीनामा

प्रतिनिधी / पणजी

राष्ट्रीय जनता दल गोवा प्रदेश अहमद कादर व सदस्य राजीनामा देत असून पक्ष बरखास्त करत आहोत. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष लालूप्रसाद यादव हे बिहार सोडून गोव्याकडे लक्ष देत नाहीत. निवडणूकीबाबत चर्चा करण्यातही त्यांचा काहीच रूची नव्हती. त्यामुळे हा पक्ष बरखास्त करण्यात निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती राष्ट्रीय जनता दल गोवा प्रमुख अहमद कादर यांनी पणजीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.  2016 साली या पक्षाचा अध्यक्ष म्हणून मला नियुक्त केले. त्यानंतर तळागाळात काम केले. पक्षाची सदस्य नोंदणी केली आणि पुढे जात राहिलो. त्यानंतर राष्ट्रीय अध्यक्षांनी निवडणूकीत काँग्रेससोबत युती करण्याचे सांगण्यात आले. परंतु 2014, 2019च्या निवडणूकीची पार्श्वभूमी पाहिली तर काँग्रेसचे अस्तित्व सध्या धोक्यात आहे. दोन तीन नेत्यांच्या विश्वासावर काँग्रेस पक्ष चालत आहे. त्यामुळे हा पक्ष बरखास्त करण्यात जास्त हीत वाटले. कुठल्या पक्षात जाणार किंवा जाणार नाही याविषयी ठरविण्यात आलेले नाही. कार्यकारी समितीने राजीनामा दिला आहे. राष्ट्रीय अध्यक्ष लक्ष देत नसल्याने पक्ष बरखास्त केला जात आहे. अशी माहिती कादर यांनी यावेळी दिली.

Advertisements

Related Stories

राज्यात ‘लॉकडाऊन’चे आशादायी परिणाम

tarunbharat

गोवा-बेळगाव चोर्ला महामार्गावर पावसाळय़ात यंत्रणा सज्ज

Amit Kulkarni

म्हापसा अर्बनचे अन्य कर्मचारीही सेवामुक्त

Patil_p

मनपासह सात पालिकांसाठी 204 अर्ज

Amit Kulkarni

गोवा पर्यटन विभागाकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचा ‘मराठा आक्रमक’ असा उल्लेख

Abhijeet Shinde

राज्यात दीपोत्सव उत्साहात

Amit Kulkarni
error: Content is protected !!