तरुण भारत

गनिमी काव्याने हदनाळमध्ये फडकवला भगवा!

शिवसेनेचा कर्नाटक पोलिसांना गुंगारा : कन्नड रक्षण वेदीकेचा तीव्र निषेध : शिवसैनिकांचे आंदोलन

प्रतिनिधी / कोल्हापूर, कागल

Advertisements

बेळगाव महापालिकेसमोर कन्नड रक्षण वेदीके संघटनेने लावलेला लाल-पिवळा ध्वज काढण्यासाठी सोमवारी बेळगावमध्ये काढण्यात येणाऱया मोर्चात सहभागी होण्यास कर्नाटक सरकारने बंदी घातल्यानंतर कोल्हापूर जिल्हा शिवसेनेने हदनाळ गावात गनिमी काव्याने भगवा झेंडा फडकविला. जिल्हाप्रमुख विजय देवणे, संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी कागलमधून बेळगाव पोलिसांना गुंगारा देत गनिमी काव्याने हदनाळमध्ये प्रवेश केला. तेथे जय भवानी, जय शिवाजी, जय महाराष्ट्रच्या घोषणा देत बेळगावबंदीची आदेशाची होळी करत शिवसैनिकांनी कर्नाटक सरकार आणि कन्नड रक्षण वेदीकेच्या कृत्याचा निषेध केला.

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने बेळगावमध्ये सोमवारी कन्नड रक्षण वेदीकेने लावलेला ध्वज काढण्यासाठी सरदार हायस्कूलच्या मैदानावरुन मोर्चा काढण्याचे नियोजन करण्यात आले होते. या मोर्चात राज्यातील शिवसैनिकांबरोबर कोल्हापूर जिल्हय़ातील शिवसैनिकही सहभागी होणार होते. पण बेळगावच्या जिल्हा प्रशासनाने जिल्हाप्रमुख विजय देवणे यांना बेळगाव जिल्हा बंदीची नोटीस पाठविली होती. त्यामुळे शिवसैनिकांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

हदनाळमध्ये फडकविला भगवा ध्वज!

कागल पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडून दिल्यानंतर शिवसैनिकांनी कर्नाटक पोलिसांना कोणताही सुगावा लागणार नाही याची दक्षता घेत गनिमी काव्याने मोटारसायकलवरून थेट हदनाळ गावात प्रवेश केला. तेथे पोहचताच शिवसैनिकांनी जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय, मराठी भाषिकांवर अन्याय करणाऱया, दडपशाही करणाऱया कर्नाटक सरकारचा निषेध असो, कन्नड रक्षण वेदिकेचा निषेध असो, अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. या घोषणाबाजीतच शिवसैनिकांनी भगवा झेंडा फडकविला. त्यानंतर शिवसैनिक कोल्हापूरला परतले. या आंदोलनात कागल तालुका प्रमुख शिवगोंड पाटील, कागल तालुका प्रमुख अशोक पाटील, उपजिल्हा प्रमुख सुजित चव्हाण, युवा सेना जिल्हा प्रमुख मंजित माने, करवीर तालुका प्रमुख विराज पाटील, करवीर तालुका प्रमुख राजू यादव, उपजिल्हा प्रमुख प्रकाश पाटील-भुदरगड, राधानगरी तालुका प्रमुख भिकाजी हळदकर, करवीर तालुका प्रमुख विनोद खोत, उपजिल्हा महिला संघटक, विद्या गिरी, तालुका महिला संघटक कांचन माने, कागल शहर महिला संघटक, दीपाली घोरपडे, विकास उरवसे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

सीमाबांधवांच्या लढय़ाला साथ

बेळगाव महापालिकेसमोर कन्नड रक्षण वेदीके संघटनेने लाल-पिवळा ध्वज लावून सिमाबांधवांसह महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या स्वाभिमानाला आव्हान दिले. कर्नाटक सरकार महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मोर्चावर निर्बंध घालत कन्नड रक्षण वेदीकेच्या कृत्याला साथ देत आहे. त्यामुळेच शिवसैनिकांनी हदनाळमध्ये भगवा फडकवित सीमाबांधवांच्या लढय़ाला साथ दिली तर कर्नाटक सरकारचा निषेध केला.

-विजय देवणे, जिल्हा प्रमुख, शिवसेना, कोल्हापूर

Related Stories

मराठा जागृती निर्माण संघातर्फे पर्यावरण दिन साजरा

Amit Kulkarni

रायगड मोहिमेसाठी हलगा येथील धारकरी सायकलवरून रवाना

Patil_p

ग्रामीण भागात धुक्यांच्या प्रमाणात वाढ

Patil_p

स्मार्टसिटीत सांडपाण्याचा गंभीर प्रश्न

Amit Kulkarni

नियती फौंडेशनतर्फे महिलांचा सत्कार

Amit Kulkarni

यंत्रात सापडून कामगाराचा मृत्यू

Patil_p
error: Content is protected !!