तरुण भारत

सातारा : …अखेर बंटी जाधव गजाआड

कुडाळ / प्रतिनिधी :

वाई तालुक्यातील तडीपार गुंड आणि मोक्यातील प्रमुख आरोपी बंटी जाधवच्या सातारा एलसीबीच्या पथकाने पंजाबमध्ये मुसक्या आवळल्या.  

Advertisements

याबाबत सविस्तर वृत्त असे की, भुईंज ता, वाई येथील रहिवासी असलेल्या बंटी जाधवने साथीदारांच्या मदतीने आसले गावच्या पुलाजवळ राहणाऱ्या चव्हाण नामक तरुणाचे अपहरण करून त्याचा खून केला होता. तसेच त्याच दिवशी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास भुईंज स्मशानभूमीत त्याचा मृतदेह जाळून पलायन केले होते. 

याप्रकरणाची गंभीर दखल जिल्हा पोलीस प्रमुख अजय कुमार बन्सल यांनी घेऊन सातारा एलसीबीचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांना बंटी जाधवला पकडण्याचे आदेश दिले होते. तेव्हा पासूनच एलसीबीचे सर्व अधिकारी पोलीस कर्मचारी हे राज्यासह पराज्यात बंटी जाधवच्या मागावर होते. 

बंटी नेपाळमध्ये असल्याची माहिती मिळाल्यावर पोलीस नेपाळला पोहचले. मात्र, पोलीस मागावर असल्याची माहिती बंटीला नेपाळ सीमेवरच मिळाली होती. त्यामुळे त्याने नेपाळला न जाता पंजाबकडे आपला मोर्चा वळवला. त्याचवेळी पंजाबमध्ये एलसीबीच्या पथकाने झडप घालून त्याच्या मुसक्या आवळल्या.

Related Stories

पोलिसांकडून दोन मटका अड्डय़ांवर छापे

Patil_p

गेल्या १४ दिवसांत मुक्तीचं प्रमाण दीडपट ; दिवसभरात १९ बाधित,१ बळी

Abhijeet Shinde

गॅस सिलेंडरच्या आगीत टपरी जळून खाक

Patil_p

तापमान 18 अंशाच्या खाली

Patil_p

सातारा जिल्ह्यात ऑगस्टखेर बाधितांचा आकडा होईल 10,000 पार

Abhijeet Shinde

शिवछत्रपतींच्या पादुकांचे आषाढी वारीसाठी जल्लोषात प्रस्थान

datta jadhav
error: Content is protected !!