तरुण भारत

‘संदीप और पिंकी फरार’चा नवा ट्रेलर

अर्जून कपूर अन् परिणितीचा गूढ चित्रपट

संदीप और पिंकी फरार या चित्रपटाचा नवा ट्रेलर प्रदर्शित आहे. अर्जून कपूर आणि परिणिती चोप्राची जोडी या ट्रेलरमध्ये अत्यंत प्रभावी दिसून येत आहे. हा चित्रपट 19 मार्च 2021 रोजी चित्रपटगृहांमध्ये झळकणार आहे. ट्रेलरमध्ये जबरदस्त सस्पेंस दिसून येतो. 1 मिनिट 46 सेकंदांच्या ‘संदीप और पिंकी फरार’ या ट्रेलरची सुरुवात पिंकी दहिया म्हणजेच अर्जून कपूर आणि संदीप कौर म्हणजेच परिणिती चोप्राच्या एंट्रीद्वारे होते. या चित्रपटाचा पहिला ट्रेलर मागील वर्षी 4 मार्च 2020 रोजी सादर करण्यात आला होता. हा चित्रपट मागील वर्षी 20 मार्च रोजी प्रदर्शित होणार होता. पण महामारीमुळे याचे प्रदर्शन रोखण्यात आले होते. आता एक वर्षाने हा चित्रपट चालू महिन्यात प्रदर्शित करण्याची पूर्ण तयारी आहे.

Advertisements

Related Stories

धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्री चित्राची हॉटेल रुममध्ये आत्महत्या

Rohan_P

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी देवेंद्र फडणवीस म्हणाले…

Rohan_P

‘काकुडा’चे सोनाक्षीने पूर्ण केले शूटिंग

Patil_p

ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित चित्रपटांनाही अनुदान मिळावे

Patil_p

‘सिर्फ एक फ्राइडे’त दिसणार अवितेश

Patil_p

प्रियामणिला झेलावे लागले होते बॉडीशेमिंग

Patil_p
error: Content is protected !!