तरुण भारत

चंद्रेश्वर भूतनाथ संस्थानात महाशिवरात्री मर्यादित स्वरूपात

वार्ताहर / पारोडा

पर्वत-पारोडा, केपे येथील श्री चंद्रेश्वर भूतनाथ संस्थानातील यंदाचा महाशिवरात्रोत्सव कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मर्यादित प्रमाणात साजरा करण्याचे संस्थान समितीने ठरविले आहे. त्यानुसार दरवर्षीप्रमाणे होणारा अभिषेकाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला असून दुपारी व रात्री होणारा महाप्रसादाचा कार्यक्रमही रद्द करण्यात आला आहे.

Advertisements

मात्र श्रींचे दर्शन सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन करूनच करता येईल, असे संस्थान समितीतर्फे कळविण्यात आले आहे. यंदाचा हा उत्सव केपे फळदेसाई वांगडीतर्फे साजरा करण्यात येणार असून उत्सवातील इतर धार्मिक विधी परंपरेनुसार होणार आहेत. तरी सर्व महाजन व भाविकांनी याची नोंद घेऊन हा उत्सव सुरळीतपणे साजरा करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन श्री संस्थान समितीने केले आहे.

Related Stories

भाजपतर्फे अघोषित आणिबाणी लागू

Patil_p

भाजपा सरकारने कठीण परिस्थितीतही चांगले कार्य करून दाखवले – मिलिंद नाईक

Omkar B

राष्ट्रपतींच्या आगमनाची तयारी युध्दपातळीवर

Patil_p

समुद्रातील चक्रीवादळामुळे आज जोरदार पावसाची शक्यता

Amit Kulkarni

सर्वाधिक बाधित, सर्वाधिक मृत्यू

Amit Kulkarni

काणकोणचा आठवडय़ाचा बाजार पुन्हा सुरू

Patil_p
error: Content is protected !!