तरुण भारत

कै. रावसाहेब गोगटे टॉप टेन करेला स्पर्धा शुक्रवारी

बैठकीत एकमताने निर्णय

क्रीडा प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ लोकमान्य टिळक मार्ग, झेंडा चौक मार्केट आयोजित कै. रावसाहेब गोगटे पाचवी टॉप टेन करेला स्पर्धा शुक्रवार दि. 12 मार्च रोजी सकाळी 11 वा. रामनाथ मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती हेमंत हावळ यांनी बैठकीत दिली.

बैठकीत बसवराज अरळीमट्टी, सचिन हिंडलगेकर, अमित किल्लेकर, मोतिचंद दोरकाडी, शिरिष गोगटे, अजित सिद्दण्णावर, गंगाधर एम., मिलिंद पाटणेकर, हेमंत हावळ व सुनील राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.

या बैठकीत पाचवी रावसाहेब गोगटे टॉप टेन करेला स्पर्धा घेण्याबाबत चर्चा करून एकमताने स्पर्धा घेण्याचा निर्णय झाला. ही स्पर्धा 12 मार्च रोजी रामनाथ मंगल कार्यालय येथे घेण्यात येणार आहे. ही स्पर्धा खुल्या गटासाठी असून, संघटनेने निवडलेला करेला या स्पर्धेत वापरण्यात येणार आहे.

टॉप टेन स्पर्धकांना अनुक्रमे 5 हजार, 3 हजार, 2 हजार व शेवटच्या सात क्रमांकाना प्रत्येकी 1 हजार रूपये देण्यात येणार आहेत.

इच्छुक स्पर्धकांनी 12 मार्च रोजी सकाळी 10 पर्यंत अजित सिद्दण्णावर, सुनील राऊत यांच्याकडे नावे नोंदवावी. अधिक माहितीसाठी हेमंत हावळ, गिरीष पाटणकर, अमित किल्लेकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Related Stories

अनुराधा पौडवाल यांची पंत महाराज मंदिराला भेट

Amit Kulkarni

वीज कोसळून दोन कामगारांचा मृत्यू

Amit Kulkarni

बसस्थानक आवारात काँक्रिटीकरण

Patil_p

बेळगावात कोविड आइसोलेशन केंद्र सुरु करा : भाजप नेते किरण जाधव यांची मंत्री जगदीश शेट्टर यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

Abhijeet Shinde

लोककल्प फौंडेशनतर्फे दुर्गम भागात औषधांचे वाटप

Omkar B

पत्रकाराच्या कुटुंबीयांना पालकमंत्र्यांकडून आर्थिक मदत

Omkar B
error: Content is protected !!