तरुण भारत

माळमारुती, एक्स्ट्रीम संघ विजयी

सिगन चषक टी-20 क्रिकेट स्पर्धा

क्रीडा प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

माळमारुती स्पोर्ट्स क्लब आयोजित सिगन चषक खुल्या टी-20 क्रिकेट स्पर्धेत बुधवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात माळमारुती स्पोर्ट्स क्लब संघाने शहापूर संघाचा 55 धावांनी तर एक्स्ट्रीम स्पोर्ट्स संघाने एस. के. संकेश्वर संघाचा सुपर ओव्हरमध्ये पराभव करून पुढील फेरीत प्रवेश केला. वैष्णव संघमित्र (माळमारूती), विशाल गौरगोंडा (एक्स्ट्रिम) यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

युनियन जिमखाना मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात माळमारुती संघाने 20 षटकात 7 बाद 151 धावा केल्या. त्यात वैष्णव संघमित्रने 1 षटकार, 7 चौकारासह 72, सागर देसाईने 21 धावा केल्या. शहापूरतर्फे वासीम मतवालेने 28 धावात 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल शहापूर सीसी संघाचा डाव 15.1 षटकात 96 धावात आटोपला. त्यात तौसिफ मतवालेने 14 तर पवनने 13 धावा केल्या. माळमारुतीतर्फे वैष्णव संघमित्रने 20 धावात 3 तर विजय कुरीने 12 धावात 2 गडी बाद केले. दुसऱया सामन्यात एक्स्ट्रीम स्पोर्ट्सने 20 षटकात 8 बाद 127 धावा केल्या. सागर अंगडी व सुनील बस्तवाड यांनी प्रत्येकी 28 धावा केल्या. एस. के. संकेश्वरतर्फे विनायक कांबळेने 16 धावात 3, मुजीदने 36 धावात 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल एस. के. संकेश्वरने 20 षटकात 8 बाद 127 धावाच केल्या. सामना टाय झाल्याने पंचांनी सुपरओव्हर नियमाचा वापर केला, त्यामध्ये एक्स्ट्रीम संघाने विजय संपादन केला. संकेश्वरतर्फे राजू सानीने 19 तर विनायक कांबळेने 13 धावा केल्या. एक्स्ट्रीमतर्फे सागर गौरगोंडा, विशाल गौरगोंडा, सचिन कलवारने प्रत्येकी 2 गडी बाद केले.

Related Stories

‘खाते बदल’चे शेकडो अर्ज प्रलंबित

Amit Kulkarni

कार्तिक स्वामी दर्शनासाठी भाविकांची रीघ

Patil_p

बकरी-ईद दिवशी गो-हत्या होणार नाही

Amit Kulkarni

पार्टीत मग्न असणाऱया पीडीओंची बदली करा

Amit Kulkarni

‘सोलार सायन्स टेक्नॉलॉजी’ डिप्लोमा कोर्स जीएसएस कॉलेजमध्ये सुरू

Amit Kulkarni

मार्कंडेय युवक संघ-व्यायाम मंदिराचा वर्धापनदिन उत्साहात

Omkar B
error: Content is protected !!