तरुण भारत

कोल्हापूर : विनिता पाटील यांना आंतरराज्य सामाजिक सेवा गौरव पुरस्कार जाहीर

वारणानगर / प्रतिनिधी

कोडोली ता. पन्हाळा येथील विनिता जयंत पाटील यांना नॅशनल रूरल डेव्हलपमेंट फाउंडेशन बेळगाव व हेल्थ अँड नेचर डेव्हलपमेंट सोसायटी यांच्यावतीने कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा या तीन राज्यामधून अंतरराज्य सामाजिक सेवा गौरव पुरस्कार जाहीर केला आहे.
२८ मार्च २०२१ रोजी बेळगाव येथे सामाजिक सेवा गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पदक,विशेष प्रमाणपत्र , सन्मान चिन्ह व म्हैसुर फेटा असे त्याचे स्वरूप आहे.

सदर पुरस्कार सोहळा कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा या तीन राज्यातील भारतीय सैन्य दलातील अधिकारी, सिने कलाकार , शिक्षण अधिकारी, राजकीय नेते व मठाधीश यांच्या प्रमुख उपस्थित होणार आहे. विनीता पाटील यांनी यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाच्या विश्वस्त म्हणून शिक्षण क्षेत्रात केलेले काम व यशस्वी फाउंडेशनच्या माध्यमातून महिला संघटन व महिला उनत्ती करीता केलेल्या कामाची दखल घेत हा पुरस्कार त्यांना जाहिर करण्यात आला आहे. विनीता पाटील यांना डॉ. जयंत प्रदीप पाटील, तसेच श्रीमती पद्मजा प्रदीप पाटील यांचे प्रोत्साहन लाभले.

Advertisements

Related Stories

कोल्हापूर : अंबाबाईचा नवरात्रौत्सव भाविकांविनाच!

triratna

कोल्हापूर : पूरग्रस्तांच्या पाठीशी शासन ठाम : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

triratna

आधार कार्ड ग्राह्य मानून धान्य पुरवठा करा – पूरग्रस्त अन्याय निवारण कृती समिती

triratna

थकीत एफआरपी संदर्भात राज्यांना नोटीस

triratna

कोल्हापूर : ‘त्या’ विज्ञान शिक्षकांना मिळणार पदोन्नती

triratna

कोल्हापूर महापालिकेची निवडणूक लांबणीवर?

triratna
error: Content is protected !!