तरुण भारत

पाणीटंचाईबाबत प्रस्तावित उपायांची अंमलबजावणी वेळेत करा : अजित पवार

ऑनलाईन टीम / पुणे : 


पाणी टंचाईवर मात करण्यासाठी आराखड्यात प्रस्तावित उपाययोजनांची अंमलबजावणी  वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिले.

Advertisements

विधानभवन येथील कौन्सिल हॉल येथे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जलजीवन मिशन जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन अंतर्गत पुणे जिल्ह्याचा संपूर्ण प्रारुप आराखड्याबाबत बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.


उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, पाण्याची गरज असलेल्या प्रत्येक  गावांमध्ये पेयजलाचा नियमित पुरवठा होण्यासाठी आराखड्यात नमूद प्रत्येक उपाययोजनेची विहित वेळेत अंमलबजावणी करावी. कुठेही अडचण उद्भवता कामा नये. सर्व ठिकाणी पाणीपुरवठा नियमित व्हावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.


खा. गिरीष बापट म्हणाले, पाणी गरज लक्षात घेत गावनिहाय नियोजन होणे आवश्यक आहे. गावातील पाणी वितरण व्यवस्था व्यवस्थीत पाहीजे, असे त्यांनी सांगितले.


जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी जलजीवन मिशन जिल्हा पाणी व स्चछता मिशन अंतर्गत पुणे जिल्ह्याचा संपूर्ण प्रारुप आराखड्याबाबत सादरीकरणाव्दारे माहिती दिली.यावेळी पाणीपुरवठ्याच्या अनुषंगाने विविध बाबींवर चर्चा करण्यात आली.  

Related Stories

एसटीची वाहतूक पूर्वपदावर आणण्यासाठी महामंडळ प्रयत्नशील, आज ३६ गाड्या धावल्या

Abhijeet Shinde

मराठा आरक्षण : ”आता लोकप्रतिनिधींनी आपली जबाबदारी स्पष्ट करावी”

Abhijeet Shinde

ही मोर्चे काढण्याची वेळ नाही: खासदार संभाजीराजेंचा पुनरुच्चार

Abhijeet Shinde

शरद पवारांचं अमित शहांना पुणे भेटीचं खास निमंत्रण

Abhijeet Shinde

राज ठाकरेंच्या नावे खंडणी मागणारी टोळी गजाआड

Abhijeet Shinde

सोलापूर : कडब्याच्या गंजी खाली २२ नागाची पिल्ले

Abhijeet Shinde
error: Content is protected !!