तरुण भारत

सांगली : ‘त्या’ सात कोटींच्या कामांचा ठराव रद्द होणार?

एक द्वितीयांश सदस्यांचा विरोध आवश्यक; हालचाली गतिमान : सर्व पक्षीय सदस्य आक्रमक

प्रतिनिधी / सांगली

जिल्हा नियोजन समितीकडून मंजूर झालेल्या ७ कोटींच्या कामांच्या प्रस्तावावरून भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या मध्ये असंतोष निर्माण झाला आहे. एक द्वितीयांश सदस्यांनी विरोध केल्यास महासभेत हा ठराव रद्द होऊ शकतो. महाराष्ट्र महापालिका अधिनियमात तशी तरतूदही आहे. याचा सहारा घेत सर्व पक्षीय नगरसेवकांनी हा ठराव रद्द करण्यासाठी कंबर कसली आहे. यामध्ये भाजप २०, काँग्रेस ११ तर राष्ट्रवादीच्या ६ हुन अधिक नगरसेवकांचा समावेश आहे. त्यामुळे मनमानी करून कामांचे वाटप केलेल्या तत्कालीन महापौर गीता सुतार यांना मोठा दणका बसणार आहे.

महापालिका क्षेत्रातील विविध विकासकामांसाठी जिल्हा नियोजन समितीने ७ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीचे नगरसेवकांना ५ ते ७ लाख, स्थायी समिती सदस्यांना १५ लाख रुपयांची कामे देण्याचा ठराव महासभेत करण्यात आला होता. तत्कालीन महापौर गीता सुतार यांनी तसे आदेशही दिले होते. मात्र प्रत्यक्ष कामे वाटप करताना महापौर सुतार यांनी त्यांच्याच आदेशाची पायमल्ली केली आहे. मार्जितल्या नगरसेवक, पदाधिकाऱ्यांच्यावर निधीची उधळण केली आहे. तर जवळपास ३६ सदस्यांचे एकही काम या प्रस्तावात समाविष्ट केलेले नाही. त्यामुळे या सदस्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. काँग्रेसचाच एक सदस्य यामध्ये कळीचा नारद असल्याचा आरोप होत आहे.

दरम्यान हा ठराव रद्द करावा यासाठी निधी न मिळालेले सदस्य प्रचंड आक्रमक झाले आहेत. भाजव, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशा सर्वच पक्षाच्या सदस्यांचा यामध्ये समावेश आहे. दरम्यान महासभेने मंजूर केलेल्या ठरवात तीन महिने बदल करता येत नाही. अथवा तो रद्द ही करता येत नाही, असे आयुक्त नितीन कापडणीस यांनी सांगितले होते. यामुळे संभ्रम निर्माण झाला होता. मात्र महाराष्ट्र महापालिका अधिनियमामध्ये जर एक द्वितीयांश सदस्यांनी या ठरावाला विरोध केल्यास हा ठराव रद्द होऊ शकतो अशी तरतूद आहे. त्यामुळे आता या तरतुदीची मदत घेत हा ठराव रद्द करण्यासाठी निधी न मिळालेल्या सदस्यांनी कंबर कसली आहे.

Related Stories

सांगली : गणेशोत्सव काळात वाहतूक व्यवस्थेत बदल

Abhijeet Shinde

विश्वासराव नाईक साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी आ. मानसिंगराव नाईक

Abhijeet Shinde

सांगली जिल्ह्यातील वारणा धरणात ३१.१९ टीएमसी पाणीसाठा

Abhijeet Shinde

कुंडल येथे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर प्रांताधिकाऱ्यांची कारवाई

Abhijeet Shinde

सांगली : भाजपा कार्यकर्त्यांच्या कष्टामुळेच सत्तेवर – आमदार सुधीर गाडगीळ

Abhijeet Shinde

वारणा धरण व चांदोली अभयारण्यग्रस्त प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी विशेष मोहिम

Abhijeet Shinde
error: Content is protected !!