तरुण भारत

ऍक्सिस बँकेकडून कॉन्टॅक्टलेस पेमेन्ट उपकरण

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

डिजिटल पेमेंटमध्ये आता कॉन्टॅक्टलेस पेमेंटला चालना देण्यासाठी ऍक्सिस बँकेने वेयरेबल कॉन्टॅक्टलेस पेमेंट उपकरणाचे सादरीकरण केले आहे.  सदरचे उपकरण ‘बँड, कि चेन आणि वॉच लूप’ यासोबत वापरता येणारे आहे. सदरच्या उपकरणाची किमत ही 750 रुपये राहणार असल्याची माहिती आहे.

Advertisements

सदरचे उपकरण ऍक्सिस बँकेच्या ग्राहकांच्या खात्यासोबत जोडले जाणार असून ते एक डेबिट कार्डच्या स्वरुपात काम करणार आहे. कोणत्याही मर्चंट स्टोअरवर याआधारे खरेदी करण्याची परवानगी मिळणार आहे. ज्यामध्ये कॉन्टॅक्टलेस व्यवहार स्विकारता येणार आहेत. वियर एन पे उपकरणाला फोनवर कोणत्याही ऍक्सिस बँकेच्या शाखेतून ऑर्डर करता येणार आहे.

विना पासवर्डचे पेमेंट

ग्राहकांना कोणत्याही पासवर्डशिवाय जवळपास 5 हजारपर्यंतचे पेमेंट करता येणार आहे. यासाठी पाँईट ऑफ सेल मशीनचा वापर करावा लागणार असल्याचे स्पष्ट केले आहे. याच्या व्यतिरिक्त आपल्या विशेष बॉण्ड्सवर 10 टक्क्यापर्यंत सवलत प्राप्त होणार आहे.

बँकेचे व्हॉट्सअप बँकिंग

ऍक्सिस बँकेच्या ग्राहकांना आता व्हॉट्सऍपवरही बँकिंगची सुविधा उपलब्ध होणार आहे. या सेवेमध्ये बँकेच्या सुट्टी दिवशीही बँक सेवा उपलब्ध होणार असल्याची माहिती आहे.

Related Stories

पुन्हा मलेशियातून पाम तेलाची आयात सुरु

Patil_p

विजया डायग्नोस्टिकचा येणार आयपीओ

Patil_p

एप्रिल-फेब्रुवारीत सोने आयातीत घट

tarunbharat

रिलायन्स रिटेलची हिस्सेदारी पीआयएफ घेणार

Patil_p

बँक ऑफ महाराष्ट्र नफ्यात

Patil_p

अदानींची 29 हजार कोटींच्या आयपीओसाठी मोठी योजना

Amit Kulkarni
error: Content is protected !!