तरुण भारत

मंगळ ग्रहावर आहे अठराशे किलोमीटर लांबीचा ढग

सूर्याच्या कुटुंबातील केवळ पृथ्वी या एकाच ग्रहावर जीवसृष्टी आहे. इतर ग्रहांवर जीवसृष्टीला अनुकूल वातावरणही नाही. फार दूरचे ग्रह सोडा, पण पृथ्वीचाच उपग्रह असणाऱया चंद्रावरही सजीव सृष्टी निर्माण होण्याची अनुकूलता नाही. तथापि, पृथ्वीच्या शेजारीच असणाऱया मंगळ ग्रहावर एकेकाळी जीवसृष्टी होती किंवा भविष्यात निर्माण होण्याची शक्मयता आहे, असं संशोधकांना वाटतं. त्यादृष्टीनं त्यांनी मंगळ ग्रहाचा बारकाईनं अभ्यास सुरू ठेवला आहे. जीवसृष्टीसाठी ऑक्सिजन, कार्बन डॉयॉक्साईड, नायट्रोजन, पाणी आणि अनुकूल भूमी यांची सर्वाधिक आवश्यकता असते. मंगळावर काही प्रमाणात हे घटक असल्याचं अभ्यासातून दिसून आलं आहे. या ग्रहावर जिवंत ज्वालामुखी आहे आणि त्यांचा अधूनमधून उदेक होत असतो. अशाच एका भीषण उदेकातून एका महाप्रचंड ढगाची निर्मिती झाली आहे. या ढगाची लांबी तब्बल 1800 किलोमीटर असल्याचं उपग्रहीय छायाचित्रांवरून दिसून आलं आहे. काही दशकांपूर्वी या ढगाचं अस्तित्व जाणवत नव्हतं. 2018 मध्ये प्रथम त्याचं दर्शन उपग्रहांवरील कॅमेऱयांना झालं आहे. त्यामुळं त्याची नव्यानं निर्मिती झाली असावी, असा संशोधकांचा कयास आहे.

युरोपियन स्पेस एजन्सी (ईएसए) च्या संशोधकांनी या ढगावर आता लक्ष केंद्रित केलं आहे. हा ढग नेहमी दिसतो असंही नाही. काही वेळा तो बेपत्ता होतो. नंतर पुन्हा दिसू लागतो. त्याच्या लांबीरुंदीतही काही प्रमाणात फरक पडतो. हा ढग नेमका कशाचा बनला आहे, हे अद्याप कोडं आहे. तो पाण्याच्या वाफेचा की इतर वायूंचा, हे समजल्यास मंगळावर पाण्याचं प्रमाण किती आहे, याचा वेध घेणं सोप जाणार आहे. भविष्यकाळात मंगळावर मानवी वस्ती करण्याच्या दृष्टीने संशोधकांची पावलं पडत आहेत. त्यासाठी तिथे पुरेसे पिण्यायोग्य पाणी, काही प्रमाणात सुपीक जमीन आणि श्वास घेण्यासाठी वायू. हे तीन घटक तरी हवेत. या ढगाचं अध्ययन केल्यास त्यादृष्टीने काही माहिती हाती येऊ शकते. युरोप व अमेरिकेने मंगळावर पाठविलेले उपग्रह सातत्याने या ढगावर लक्ष ठेवून आहेत. या ढगात त्यांना काही आशेचे किरण दिसत आहेत.

Advertisements

Related Stories

अँथोनी फुकी यांच्याकडून क्षमायाचना

Patil_p

न्यूझीलंडमधील भारतीय वंशाच्या महिला मंत्र्यांनी केले मल्याळममध्ये भाषण

datta jadhav

ज्युनिअर डोनाल्ड ट्रम्प कोरोनाबाधित

datta jadhav

धूम्रपान सोडण्यासाठी डोकं पिंजऱयात कैद

Patil_p

कोरोनापुढे हतबल झालेल्या अमेरिकेने मागितली भारताकडे मदत

prashant_c

लॉयड ऑस्टिन अमेरिकेचे नवे संरक्षणमंत्री होणार

Patil_p
error: Content is protected !!