तरुण भारत

सभा-समारंभांसाठी नियम आणखी कठोर

काटेकोर पालन करण्याची सूचना -कोरोनाची दुसरी लाट थोपविण्यासाठी उपाययोजना

प्रतिनिधी/ बेंगळूर

Advertisements

कोरोनाचा सर्वात वेगाने फैलाव होणाऱया राज्यांमध्ये कर्नाटकाचाही समावेश आहे. राज्यात कोरोनाच्या दुसऱया लाटेची भीती वाढली असून खबरदारी म्हणून राज्य आरोग्य खात्याने कठोर नियम जारी केले आहेत. त्यामध्ये विवाह समारंभांमध्ये 500, वाढदिवस कार्यक्रम, अंत्ययात्रेत 100 पेक्षा अधिक जणांनी सहभागी होऊ नये, असा आदेश आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याचे अप्पर मुख्य सचिव जावेद अख्तर यांनी दिला आहे.

बेंगळूरसह राज्यातील अनेक शहरांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण वाढले आहे. कोरोनाची दुसरी लाट थोपविण्यासाठी नियमांचे काटेकोर पालन व्हावे, या उद्देशाने आरोग्य खात्याने नियमांसंबंधीचे आदेशपत्रक जारी केले आहे.

आंतरराज्य प्रवास, कोविड चाचण्या आणि कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी खालील जिल्हय़ांसाठी दररोजच्या किमान चाचण्यांची संख्या निर्धारित करण्यात आली आहे. बेळगाव 3 हजार, बेंगळूर शहर व बेंगळूर महापालिका कार्यक्षेत्रात 40 हजार, मंगळूर 3 हजार, म्हैसूर 5 हजार, तुमकूर 3 हजार 500, उडुपी 2 हजार आणि विजापूर जिल्हय़ाला दररोज किमान 2 हजार चाचणी करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. उर्वरित जिल्हय़ांना यापूर्वी दिलेल्या उद्दिष्टामध्ये बदल केलेला नाही. बेळगावसह, बळ्ळारी, दावणगेरे, चिक्कमंगळूर, बागलकोट, विजापूर, मंगळूर, तुमकूर, बिदर, गुलबर्गा, उडुपी, बेंगळूर शहर आणि बेंगळूर ग्रामीण जिल्हय़ांना चाचण्यांचे दररोजचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची सूचना देण्यात आली आहे.

मंगळूर, बेंगळूर ग्रामीण, उडुपी, बिदर आणि गुलबर्गा जिल्हय़ांमध्ये कोरोनाबाधितांच्या संपर्कात येणाऱयांचा त्वरित शोध घेण्याचे प्रमाण एकास 20 इतके असावे. कोविड चाचणी आणि लस घेण्यासंबंधी जनतेत जागृती करण्यासाठी विविध माध्यमांचा अवलंब करावा. जिल्हाधिकाऱयांनीही यासंबंधी जनतेपर्यंत आवश्यक संदेश पोहोचवावा, अशा सूचनाही आरोग्य खात्याने केल्या आहेत.

सभा-समारंभांसाठी केंद्र सरकारच्या मार्गसूचीनुसार दोन व्यक्तींमध्ये किमान 3 मिटर अंतर असावे. खुल्या जागेतील विवाह समारंभांमध्ये 500 पेक्षा अधिक आणि विवाह मंटप, हॉलमध्ये 200 पेक्षा अधिक जणांनी एकत्र जमू नये. तसेच वाढदिवस व नामकरण सोहळय़ासाठी खुल्या जागेत 100 पेक्षा अधिक आणि बंदिस्त असणाऱया हॉल व इतर ठिकाणी 50 हून अधिक जणांनी एकत्र येण्यास मज्जाव आहे. अंत्यदर्शन किंवा अंत्ययात्रा, अंत्यसंस्कारावेळी 50 ते 100 जणांपेक्षा अधिक जण जमणार नाहीत याची खबरदारी घेण्याचीही सूचना करण्यात आली आहे. इतर समारंभांमध्ये सभागृहाच्या आकारमानानुसार 100 पेक्षा अधिक लोकांनी एकत्र येऊ नये. मोकळय़ा जागेतील धार्मिक कार्यक्रम आणि राजकीय कार्यक्रमांमध्ये 500 पेक्षा अधिक जणांच्या उपस्थितीवरही निर्बंध घालण्यात आले आहे.

नियमावली…

कार्यक्रम/ इतर  उपस्थितांची मर्यादा         ठिकाण

विवाह                        500 पेक्षा कमी    खुले मैदान किंवा जागा

                     200 पेक्षा कमी    विवाह हॉल, सभागृह

वाढदिवस, नामकरण 100 पेक्षा कमी        मोकळी जागा

                     50 पेक्षा कमी      बंदिस्त इमारत किंवा हॉल

अंतिम दर्शन     100 पेक्षा कमी    खुली जागा

                     50 पेक्षा कमी      बंदिस्त जागा, हॉल

अंत्यविधी        50 पेक्षा कमी      स्मशान व अन्य जागा

इतर समारंभ    100 पेक्षा कमी    हॉलच्या आकारमानानुसार

धार्मिक कार्यक्रम           500 पेक्षा कमी    मोकळे मैदान किंवा जागा

राजकीय कार्यक्रम          500 पेक्षा कमी    मोकळे मैदान किंवा जागा

Related Stories

“भाजपसोबत राहिलो असतो, तर मुख्यमंत्री असतो”

Abhijeet Shinde

कर्नाटक : वापरलेले मास्क, ग्लोव्हज विल्हेवाट बाबत न्यायालयाने मागितले स्पष्टीकरण

Abhijeet Shinde

देवेगौडा आज घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

Amit Kulkarni

कर्नाटकात मंगळवारी १४ हजाराहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त

Abhijeet Shinde

बेंगळूर : पावसामुळे नुकसान झालेल्या पीडितांना मिळणार २५ हजार

Abhijeet Shinde

पुनीतच्या नेत्रदानामुळे कर्नाटकात नेत्रचळवळ उभी

Abhijeet Shinde
error: Content is protected !!