तरुण भारत

विराप्पा मोईली यांना साहित्य अकादमी पुरस्कार

एच. एस. ब्याकोड यांच्या कादंबरीला बालसाहित्य पुरस्कार

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

Advertisements

केंद्र सरकारच्या सांस्कृतिक विभागांतर्गत दरवर्षी जाहीर होणाऱया साहित्य अकादमी पुरस्कारांची घोषणा शुक्रवारी करण्यात आली. 20 भाषांमधील पुरस्कार्थींची नावे जाहीर करण्यात आली असून त्यामध्ये सात कविता संग्रह, चार कादंबऱया, पाच कथासंग्रह, दोन नाटके आणि प्रत्येकी एक आत्मचरित्र आणि महाकाव्याचा समावेश आहे. कर्नाटकमधील साहित्यिक आणि राजकीय नेते एम. विराप्पा मोईली यांच्या ‘श्री बाहुबली अहिमसादिग्विजयम’ या महाकाव्याला कन्नडसाठी सन 2020 चा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच, ‘नानू आंबेडकर’ (मी आंबेडकर) या एच. एस. ब्याकोड यांच्या कादंबरीला बालसाहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. 1 लाख रुपये रोख आणि शाल-श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरुप असून लवकरच दिल्ली येथे होणाऱया सोहळय़ात पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे. मल्ल्याळम, संस्कृत आणि तामिळ भाषेतील पुरस्कारांची घोषणा अद्याप झालेली नाही.

महाराष्ट्र-नागपूरमधील साहित्यिक नंदा खरे यांच्या ‘उद्या’ या कादंबरीला मराठीसाठी सन 2020 चा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच, ‘आबाची गोष्ट’ या आबा गोविंद महाजन यांच्या लघुकथा संग्रहास बालसाहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे.

गोव्यामधील साहित्यिक आर. एस. भास्कर यांच्या ‘युगपरिवर्तनांचो यात्री’ या काव्यसंग्रहाला कोकणीसाठी सन 2020 चा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच, व्ही. कृष्ण वाघ्यार यांच्या ‘बालू’ या लघु कादंबरीला बालसाहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे.

Related Stories

दहशतवाद्यांचे ‘डाव’ रोखणारच!

Patil_p

श्रीनगर : ‘लष्कर ए तोयबा’च्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा

Sumit Tambekar

अखेर तिन्ही कृषी कायदे रद्द

Patil_p

त्रालमध्ये तीन दहशतवाद्यांना कंठस्नान

datta jadhav

क्लायमेट वीकसाठी भूमीला आमंत्रण

Patil_p

दिल्लीत गेल्या 24 तासात 1113 नवे कोरोना रुग्ण; 14 मृत्यू

Rohan_P
error: Content is protected !!