तरुण भारत

पाक संघामध्ये शार्जिल खानचा समावेश

वृत्तसंस्था/ कराची

पाकचा क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिका आणि झिंबाब्वेच्या क्रिकेट दौऱयावर जाणार आहे. या दौऱयासाठी शुक्रवारी पीसीबीने क्रिकेटच्या तिन्ही विविध प्रकारासाठी तीन विविध संघांची घोषणा केली. पाकच्या टी-20 संघामध्ये सलामीचा फलंदाज शार्जिल खानचा समावेश केला आहे.

Advertisements

2017 च्या ऑगस्टमध्ये सलामीचा डावखुरा फलंदाज शार्जिल खान स्पॉट फिक्सिंग प्रकरणात दोषी आढळल्याने त्याच्यावर पाक क्रिकेट मंडळाच्या भ्रष्टाचार विरोधी मंडळाने पाच वर्षांसाठी बंदी घातली होती. संयुक्त अरब अमिरातमध्ये झालेल्या पाक सुपर लिग क्रिकेट स्पर्धेत आर्थिक भ्रष्टाचाराच्या आरोपावरून शार्जिल खानावर अडीच वर्षांच्या कालावधीसाठी बंदी पीसीबीने घातली होती.

शुक्रवारी पाक संघाच्या दक्षिण आफ्रिका आणि झिंबाब्वे या दुहेरी क्रिकेट दौऱयासाठी निवड समिती प्रमुख मोहम्मद वासीमने संघाची घोषणा केली. दक्षिण आफ्रिकेच्या दौऱयात पाकचा संघ तीन वनडे आणि चार टी-20 सामने खेळणार आहे. तसेच झिंबाब्वेच्या दौऱयात पाकचा संघ दोन कसोटी आणि तीन वनडे सामने खेळेल. या दोन्ही दौऱयांसाठी पाकने एकूण 22 खेळाडूंची निवड केली आहे.

पाक टी-20 संघ- बाबर आझम (कर्णधार), शार्जिल खान, आसिफ अली, हैदर अली, मोहम्मद हाफीज, दानिश अझीझ, फईम अश्रफ, मोहम्मद नवाज, मोहम्मद वासीम ज्युनिअर, शदाब खान, मोहम्मद रिझवान, सर्फराज अहमद, अश्रद इक्बाल, हॅरीस रॉफ, हसन अली, मोहम्मद हेसनेन, शाहीन आफ्रिदी, उस्मान कादीर.

पाकचा वनडे संघ- बाबर आझम (कर्णधार), अब्दुल्ला शफीक, फक्र जमान, दानिश अझीझ, इमाम उल हक, एस. शकील, हैदर अली, फईम अश्रफ, मोहम्मद नवाज, मोहम्मद वासीम ज्युनियर, शदाब खान, मोहम्मद रिझवान, सर्फराज अहमद, हॅरीस रॉफ, हसन अली, मोहम्मद हेसनेन, शाहीन आफ्रिदी आणि उस्मान कादीर.

पाक कसोटी संघ- बाबर आझम (कर्णधार), अबीद अली, अब्दुल्ला शफीक, इम्रान बट, फवाद आलम, अझहर अली, एस. शकील, सलमान अली आगा, फईम अश्रफ, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिजवान, सर्फराज अहमद, हॅरीस रॉफ, हसन अली, शाहीन आफ्रिदी, एस. दहानी, तबीश खान, जाहीद मेहम्मूद, साजीद खान आणि नौमन अली.

Related Stories

इंग्लंडचा पहिला डाव 369 धावात संपुष्टात

Patil_p

रूमानियाची हॅलेप अजिंक्य

Patil_p

सायना नेहवाल उपांत्यपूर्व फेरीत

Amit Kulkarni

दशकातील सर्वोत्तम खेळाडूसाठी कोहली, अश्विनला नामांकन

Patil_p

इंग्लंडचा दक्षिण आफ्रिकेवर पाच गडय़ांनी विजय

Patil_p

लॉर्ड्सऐवजी साऊदम्प्टनमध्ये अंतिम लढत

Patil_p
error: Content is protected !!