तरुण भारत

वेदिकेच्या कार्यकर्त्यांचा धुडगूस

शिवसेना कार्यालयावर हल्ल्याचा प्रयत्न

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisements

बेळगावच्या शांततेला सुरुंग लावण्याचे प्रयत्न सुरूच आहेत. शुक्रवारी दुपारी रक्षण वेदीकेच्या मुठभर कार्यकर्त्यांनी रामलिंगखिंड गल्ली येथे धुडगूस घातला. पोलीस अधिकाऱयांच्या उपस्थितीत शिवसेना कार्यालयावर हल्ल्याचा प्रयत्न झाला. जिल्हा प्रमुख प्रकाश शिरोळकर यांच्या वाहनावरील मराठी फलकाला काळे फासून तो फलक हटविण्यात आला. या घटनेने तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.   शिवसेना व महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यालयांना संरक्षण पुरविलेले असताना अशा घटना घडतात कशा? असा सवाल उपस्थित केला जात आहे. घटनेची माहिती समजताच रामलिंगखिंड गल्ली परिसरात शिवसेना व महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली. यावेळी वादावादीचाही प्रसंग घडला.

पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे, मार्केटचे एसीपी सदाशिव कट्टीमनी, खडेबाजार पोलीस निरीक्षक धिरज शिंदे आदी वरि÷ अधिकाऱयांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. शुक्रवारी पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील काही धाब्यांवरील मराठी फलकांना काळे फासण्यात आले आहे. त्यानंतर रामलिंगखिंड गल्ली येथील शिवसेना कार्यालयावर हल्ल्यासाठी गळय़ात लाल-पिवळा घातलेले मुठभर वेदीकेचे कार्यकर्ते दाखल झाले.

कार्यालयावर हल्ला करण्याआधीच जिल्हा प्रमुख प्रकाश शिरोळकर हे तेथे पोहोचले. त्यांना पाहताच त्यांच्या एमएच 04 ईएक्स 6196 क्रमांकाच्या कारवरील शिवसेना जिल्हा प्रमुख सीमाभाग बेळगाव या फलकावर काळे फासण्यात आले. हा फलक मोडून काढण्यात आला. प्रकाश शिरोळकर व प्रवीण तेजम यांनी त्यावेळी प्रतिकार केला. कार्यकर्त्यांची गर्दी वाढताच पोलिसांनी त्यांना पिटाळून लावले.

या घटनेनंतर मराठी कार्यकर्ते घटनास्थळी जमले. शुभम शेळके, बंडू केरवाडकर, महादेव पाटील, नेताजी जाधव, सरिता पाटील, अजित कोकणे आदींसह नेते, कार्यकर्त्यांनी रामलिंगखिंड गल्लीपासून धर्मवीर संभाजी चौकापर्यंत मोर्चा काढला. शिवसेना कार्यालयावर हल्ल्याचा प्रयत्न करणाऱया वेदिकेच्या कार्यकर्त्यांना त्वरित अटक करावी, अशी मागणी पोलीस उपायुक्तांकडे निवेदनाव्दारे करण्यात आली.  

तालुका म. ए. समितीतर्फे त्या गुंडांचा निषेध

शिवसेना कार्यालयावर भ्याड हल्ला करुन कारवरील फलक तोडणाऱया व मराठी फलकांची नासधुस करुन काळे फासणाऱया गुंडांचा तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने तीव्र शब्दात निषेध केला आहे. कायदा हातात घेवून शहरात अशांतता पसरविण्याबरोबरच भाषिक तेढ निर्माण करण्याचाच हा प्रकार आहे. अशा हल्ल्यांना मराठी जनतेने आजवर कधी भिक घातलेली नाही. कर्नाटक सरकार भाषिक अल्पसंख्यांकांचे हक्क व अधिकार डावलत असून कन्नड गुंडांना अभय देत आहे. पोलिसांच्या उपस्थितीतच हा प्रकार घडला आहे. त्यामुळे कुचकामी पोलीस यंत्रणेचा सुध्दा निषेध नोंदविण्यात आला आहे. या पत्रकावर सरचिटणीस मनोज पावशे, उपाध्यक्ष सुरेश डुकरे, यल्लाप्पा बेळगावकर, अशोक पाटील, पिराजी मुचंडीकर, पौर्णिमा पाटील आदींच्या सह्या आहेत.

Related Stories

हवामानातील बदलाचा रब्बी पिकांवर परिणाम

Omkar B

म्हाळेनट्टीत ‘आमचा गाव आमचा तलाव’ अंतर्गत तलावाची खोदाई

Amit Kulkarni

होम क्वारंटाईनबद्दल गोंधळाचे वातावरण

Patil_p

सर्वलोकसेवा फौंडेशनतर्फे सफाई कर्मचाऱयांना मास्क वाटप

Amit Kulkarni

संकेश्वरमध्ये बाहेर फिरणाऱयांची धरपकड

Patil_p

दोन एकरातील ऊस जळून खाक

Patil_p
error: Content is protected !!