तरुण भारत

शिवरात्री संगीतोत्सवाला रसिकांची दाद

प्रतिनिधी/ बेळगाव

संगीत कलाकार संघ व सरस्वती वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने महाशिवरात्रीनिमित्त वाचनालयाच्या माई ठाकुर सभागृहात शिवरात्री संगीतोत्सव पार पडला. वाचनालयाच्या अध्यक्षा स्वरूपा इनामदार व कलाकार संघाचे उपाध्यक्ष मुकुंद गोरे, सचिव प्रभाकर शहापूरकर यांनी दीपप्रज्वलन केले.

Advertisements

यानंतर आसोदे व पांडुरंग देशपांडे यांनी भक्तीगीते सादर केली. सीमा कबटे यांनी भक्तीगीत आणि वचन गायन केले. रोहिणी कुलकर्णी यांनी राग मारूबिहाग, तराना आणि कुमारजींचे भजन सादर केले. संगीत भास्कर पदवी मिळविल्याबद्दल गुरुराज कुलकर्णी यांचे अभिनंदन करण्यात आले. त्यांनी राग शुद्ध कल्याण, अभंग आणि भजन सादर केले.

संजय देशपांडे यांनी सतारीवर राग बरखा आणि माझे माहेर पंढरी ही रचना सादर केली. श्रीधर कुलकर्णी यांनी राग जोग आणि सरस्वती सादर केला. डॉ. सुधांशु कुलकर्णी यांनी राग शंकर सादर केला. प्रभाकर शहापूरकर यांनी ‘राग मिया की मल्हार’ सादर करून कन्नड वचनांचे गायन केले. राजप्रभू धोत्रे यांनी कानडा राग सादर केला. मुकुंद गोरे यांनी राग वसंतमध्ये ‘पशुपते गिरीजापते’ हे गीत सादर केले. ‘सर्वात्मका सर्वेश्वरा’ या भैरवीने सांगता झाली.

सर्व गायकांना चिदंबर तोरवी, संतोष पुरी, वैभव गाडगीळ, राहुल मंडोळकर, कृष्णा येरी, जितेंद्र साबण्णावर, निरंजन मूर्ती यांनी संवादिनी व तबल्याची साथ केली.

Related Stories

कुडची नगराध्यक्ष-उपनगराध्यक्षांनी स्वीकारला पदभार

Patil_p

बेळगावच्या फ्लाईंग स्कूलचा प्रस्ताव अडकला लालफितीत

Amit Kulkarni

बेळगाव रेल्वेस्थानकावर तिसऱया डोळय़ाची राहणार नजर

Patil_p

लॉकडाऊन काळात शिवारात रंगताहेत पाटर्य़ा

Amit Kulkarni

रेल्वे स्टेशन येथील हेस्कॉम कार्यालय झाले खुले

Rohan_P

कार चोरीप्रकरणी अल्पवयीन मुलांना अटक

Amit Kulkarni
error: Content is protected !!