तरुण भारत

सातारा : लोणंद येथे जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल

प्रतिनिधी / लोणंद

पाडेगाव ता. खंडाळा गावच्या हद्दीत करणी भूतबाधा उतरवण्याचा दावा करून लुबाडणाऱ्या भोंदू देवरूषी विठ्ठल किसन गायकवाड सद्या राहणार क्षेत्र पाडेगाव लोणंद नीरा रोड लोणंद ता.खंडाळा जि.सातारा याच्यावर जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून ही कारवाई अंनिस व लोणंद पोलिसांनी केली आहे.

याबाबत लोणंद पोलिस स्टेशनवरुन मिळालेली अधिक माहिती अशी की विठ्ठल किसन गायकवाड हा पाडेगाव ता खंडाळा जि सातारा येथे गावातून तसेच परगावातील येणा-या लोंकाचा दरबार भरवुन दैवी शक्ती करणी, जादुटोणा, भुतबाधा झाली आहे. असे सांगुन मनामध्ये भिती निर्माण करुन लोंकाची दिशाभुल व आर्थिक फसवणुक करीत असतो. त्यानुसार शनिवारी सकाळी 11.00 वा चे सुमारास मी पोउनि गणेश माने व त्यांचे सोबत असणा-या स्टाफ याची अंनिस चे कार्यकर्ते यांनी लोणद पोलीस येथे भेट घेतली व त्यांना लोंणद ते निरा जाणारे रोडलगत पाडेगाव ता खंडाळा येथे घडत असलेल्या जादुटोणा अंतर्गत अपराधाची माहीती दिली.

Advertisements

त्याप्रमाणे दुपारी 01 .00 वा चे सुमारास दोन पंच छापा कारवाईतील इतर पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार व लोणंद पोलीस ठाणे येथुन खाजगी वाहनाने रवाना झाले.लोणद ते नीरा जाणारे रोड ने पाडेगाव खंडाळा जि सातारा येथे गाडी थोड्या अंतरावर लावून सोबत आलेले पंच असे विठ्ठल किसन गायकवाड यांचे घरी गेले.त्यावेळी आम्हाला त्याचे दरबारामध्ये तो अतिद्रिय दैवी शक्ती अंगात आलेला बहाणा करुन लोंकाच्या समस्या सोडवत होता.

ठरल्याप्रमाणे पोलीसांनी विठ्ठल किसन गायकवाड यांची घराची पाहणी केली. त्यावेळी त्या ठिकाणी बरेच लोक बसलेले होते व त्याचेपुढे विठ्ठल किसन गायकवाड बसला होता त्याच्या पुढ्यात कवड्या होत्या. पोलींसानी देवाचा गाभारा व आजुबाजुला झडती घेतली व जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशा भोंदू बाबांचे पीक सध्या सर्वत्र वाढत आहे जनतेने अशा बाबींपासून दूर रहावे व निर्भयपणे असे प्रकार कोठे चालत असतील तर तक्रार दयावी असे आवाहन अंनिसने केले आहे. या संपूर्ण कारवाईत महाराष्ट्र अंनिसचे राज्य प्रधान सचिव प्रशांत पोतदार ऍड.हौसेराव धुमाळ पोलिस उपनिरीक्षक गणेश माने कॉन्स्टेबल प्रिया दुरगुडे पोलिस हवालदार ए.के.नलवडे पोलीस नाईक ज्ञानेश्वर मुळीक कॉन्स्टेबल गोविंद आंधळे सातारा अंनिस व लोणंद पोलिस यांनी ही कारवाई केली आहे.

Related Stories

सातारा : ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम लोकचळवळ व्हावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

triratna

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला जावलीच्या युवकांचा पाठिंबा

Patil_p

महामार्गाच्या कामात पालिकेला खुदाईची घाई

Amit Kulkarni

सातारा : लोणंदच्या बाजार समितीत ‘गरवा कांद्या’ला उच्चांकी दर !

triratna

सातारा शिक्षण विभागाचा खासगी शाळांना दणका

datta jadhav

सातारा : कांदाटी सोळाशी कोयना भागातील शासकीय प्रवासी लाँच सुरु करा

triratna
error: Content is protected !!