तरुण भारत

बुमराहच्या विवाह सोहळय़ासाठी फक्त 20 निमंत्रित!

मोबाईलला परवानगी नाही!

गोवा / वृत्तसंस्था

Advertisements

भारतीय संघातील स्टार गोलंदाज जसप्रित बुमराह व स्पोर्टस अँकर संजना गणेशन यांचा आज (रविवार दि. 14) गोव्यात विवाहसोहळा होणार असून सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या सोहळय़ाला कुटुंबातील फक्त 20 सदस्यांची उपस्थिती असणार आहे. या सोहळय़ाबाबत कमालीची गुप्तता पाळली गेली असून सोहळय़ाला उपस्थित सदस्यांना मोबाईल आणण्यास परवानगी नसेल, असे वृत्त इंग्रजी प्रसारमाध्यमांनी शनिवारी दिले.

मागील आठवडाभरापासूनच बुमराह व संजना यांच्या विवाह सोहळय़ाची चर्चा रंगली आहे. मात्र या उभयतांपैकी कोणीही त्याला अद्याप दुजोरा दिलेला नाही. प्रारंभी बुमराहने इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेतून अर्ध्यातून विश्रांती घेतली. चौथ्या कसोटीत व नंतर टी-20, वनडे मालिकेत तो खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले. वैयक्तिक कारणास्तव तो खेळणार नाही, असे मंडळाने प्रारंभी म्हटले. पण, बुमराहने आपल्या विवाह सोहळय़ासाठी सुटी घेतल्याचे नंतर चर्चेत आले. संजना गणेशन ही स्टार स्पोर्टस नेटवर्कची स्पोर्टस अँकर राहिली आहे.

स्पीडस्टार बुमराह यांनतर एप्रिलमध्ये खेळवल्या जाणाऱया आयपीएल स्पर्धेच्या माध्यमातून व्यावसायिक पुनरागमन करेल. आयपीएलमध्ये बुमराह मुंबई इंडियन्सकडून खेळत आला आहे.

Related Stories

युवराज सिंग कडून दिल्ली सरकारला 15 हजार एन-95 मास्कची मदत

prashant_c

शेफिल्ड युनायटेड खेळाडूंची वेतन कपातीला मान्यता

Patil_p

ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेत ठाकुर पिता-पुत्राचे विजय

Patil_p

पहिल्या कसोटीत इंग्लंड विजयाच्या उंबरठय़ावर

Patil_p

आशिया चषक स्पर्धेत भारत खेळणार नाही : बीसीसीआय

Patil_p

पाक संघाकडून झिंबाब्वेला ‘फॉलोऑन’

Patil_p
error: Content is protected !!