तरुण भारत

मुंबई सिटी एफसी आयएसएलच्या सातव्या मोसमाचे विजेते

क्रीडा प्रतिनिधी/ मडगाव

बिपीन सिंगने सामन्याच्या शेवटच्या मिनिटाला केलेल्या निर्णायक गोलामुळे मुंबई सिटी एफसीने आरंभीच्या पिछाडीनंतर एटीके मोहन बागानचा 2-1 गोलानी पराभव करून आयएसएलच्या झळाळत्या चषकावर आपले नाव पहिल्यांदाच कोरले. यंदाच्या लीगमधील शील्ड आणि काल आयएसएलचा चषक असा दुहेरी पराक्रम मुंबई सिटीने यंदाच्या आयएसएल स्पर्धेत केला. या जेतेपदाने मुंबई सिटीला रोख 8 कोटी आणि आकर्षक चषक तर उपविजेता एटीके मोहन बागानला रोख 4 कोटी प्राप्त झाले.           

Advertisements

काल फातोर्डा येथील नेहरु स्टेडियमवर आयएसएलच्या सातव्या मोसमातील अंतिम सामना खेळविण्यात आला. मध्यंतराला उभय संघ 1-1 अशा बरोबरीत खेळत होते. मुंबई सिटी एफसीसाठी एटीके मोहन बागानच्या टिरी याच्याकडून सॅल्फ गोलची नोंद झाली तर बिपीन सिंगने एक गोल केला. पराभूत एटीके मोहन बागानचा एकमेव गोल डॅव्हिड विलियम्सने नोंदविला.

अंतिम सामन्यात दोन्ही संघांनी आक्रमक खेळ केला. लीगमध्ये दोन्ही टप्प्यात मुंबई सिटीविरूद्ध पराभव स्वीकारलेल्या एटीके मोहन बागानने पहिल्या सत्रात कित्येक वेळा मुंबई सिटीच्या भक्कम बचावफळीवर वेळोवेळी दबाव आणला. रॉय कृष्णा, ऑस्ट्रेलियन डेव्हिड विलियम्स आणि झेवियर हर्नांडिझच्या आक्रमक खेळामुळे मुंबईचा गोलरक्षक अमरींदर सिंगला नेहमीच दक्ष रहावे लागले.

सामन्याच्या बाराव्या मिनिटाला एटीके मोहन बागानने सामन्यातील आपले पहिले धोकादायक आक्रमण केले. यावेळी झेवियर हर्नांडिझने फ्रिकीवरून मारलेला फटका गोलच्या खांब्याला आदळला. लगेच एटीके मोहन बागानचे दुसरे आक्र  मणही वाया गेले. यावेळी कार्ल मॅकहय़ुजने दिलेल्या पासवर रॉय कृष्णाने हाणलेला फटका मुंबई सिटीचा गोलरक्षक अमरींदर सिंगने एकहाती झेपावत अडविला. त्यानंतर अडविलेला चेंडू समोर मोकळा असलेल्या झेवियर हर्नांडिझला मिळाला, मात्र त्याने दिशाहीन फटका हाणल्याने एटीकेची गोल करण्याची संधी गमविली.

दोन आक्रमणे वाया गेल्यानंतर एटीके मोहन बागानने 18व्या मिनिटाला गोल करून आघाडी घेतली. रॉय कृष्णाच्या पासवर डॅव्हिड विलियम्सने मुंबईचा गोलरक्षक अमरींदर सिंगला भेदले व चेंडू जाळीत टोलविला. त्यानंतर सामन्याच्या 26व्या मिनिटाला मुंबईची गोल बाद करण्याची संधी थोडक्यात हुकली. यावेळी अहमद जाहूच्या लाँग बॉलवर ऍडम फोंड्रेने दिलेल्या पासवर रेनीयर फर्नांडिसचा फटका अरिंदम भट्टाचार्यने झेपावत अडविला.

सामन्याच्या 29व्या मिनिटाला मुंबई सिटी एफसीला सॅल्फ गोलवर बरोबरी साधता आली. यावेळी अहमद जोहूने लांब पल्ल्यावरून फटका हाणत बिपीन सिंगला चेंडू पुरविला होता, मात्र जोहूचा फटका परतविण्याच्या यत्नात टिरीने स्वताच्याच गोलमध्ये चेंडू टोलविला. यावेळी गोलरक्षक अरिंदमने गोल वाचविण्याचा केलेला यत्नही असफल ठरला.

31व्या मिनिटाला रेनीयर फर्नांडिस व ऍडम फोंड्रेच्या चालीवर हय़ुगो बुमूसचा तर 36व्या मिनिटाला ऍडमच्या पासवर बिपीन सिंगचा हेडरने गोल करण्याचे यत्न निष्फळ ठरले. सामन्याच्या दुसऱया सत्रातही उभय संघाचे समान वर्चस्व लढतीवर आढळून आले.

53व्या मिनिटाला मुंबईच्या रेनीयर फर्नांडिसचा गोल करण्याचा यत्न एटीके मोहन बागानच्या अरिंदम भट्टाचार्यने उधळून लावल्यानंतर पाच मिनिटांनी त्यांच्या हय़ुगो बुमूसने सामन्यातील सर्वांत सोपी संधी फटका गोलबारवरून मारून वाया घालविली. लगेच हर्नान सांतानाचाही फटका अरिंदमने अडविल्याने मुंबईची विजय गोल करण्याची संधी हुकली.

सामना आता जादा वेळेत जाणार असे वाटत असताना मुंबई सिटी एफसीने एटीके मोहन बागानचा गोलरक्षक अरिंदम भट्टाचार्यचा चुकीचा फायदा घेत अजिंक्यपद मिळविणारा गोल केला. यावेळी बदली स्ट्रायकर बार्थोलोमियाँव ओगबेचेने बचावफळीतील खेळाडूंना गुंगारा देत चेंडू बिपीन सिंगला दिला. बिपीनने संधीचा अचुक उपयोग करताना एक प्लेसमेंट फटक्यावर अरिंदमला भेदले आणि गोल केला. 

Related Stories

निरंकाल येथे खाली आलेल्या वीज वाहिनीमुळे वाहनांना धोका

Amit Kulkarni

लोकोत्सवात खाद्यपदार्थाच्या दालनांवर ग्राहकांची गर्दी

Patil_p

पणजीत 22 पासून मारुतीराय संस्थान जत्रोत्सव

Amit Kulkarni

मंगळवारी दोघांचा बळी

tarunbharat

सत्तरीच्या विकासासाठी सदैव प्रयत्नरत राहणार

Amit Kulkarni

आमदार अपात्रता सुनावणी पुढे ढकलली जाणार नाही

Amit Kulkarni
error: Content is protected !!