तरुण भारत

1 कोटी द्या, महागडे विधी करावे लागणार

व्हेजच्या जागी मिळाला नॉनव्हेज पिझ्झा

दिल्लीला लागून असलेल्या उत्तरप्रदेशच्या गाझियाबादमध्ये एका कंपनीला महिलेला व्हेजच्या (शाकाहारी) जागी नॉनव्हेज (मांसाहारी) पिझ्झा देणे चांगलेच महागात पडले आहे. या महिलेनेआता कंपनीवर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत 1 कोटी रुपयांच्या भरपाईसाठी खटला दाखल केला आहे.

Advertisements

गाजियाबादमध्ये एका शाकाहारी महिलेने अमेरिकन कंपनीच्या रेस्टॉरंटमध्ये व्हेज पिझ्झाची ऑर्डर दिली होती, पण चुकून तिला नॉनव्हेज पिझ्झा पाठविण्यात आला. याप्रकरणी महिलेने धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत ग्राहक न्यायालयात कंपनीच्या विरोधात 1 कोटी रुपयांच्या भरपाईचा दावा केला आहे. धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असून यातून बाहेर पडण्यासाठी कठोर आणि महागडे धार्मिक विधी करावे लागणार असल्याचे महिलेचे म्हणणे आहे.

धार्मिक मान्यता, शिक्षण, कौटुंबिक परंपरा, स्वतःचा विवेक आणि पसंतीने शुद्ध शाकाहारी आहे. नॉनव्हेज पिझ्झा खाल्ल्यावर पिझ्झाच खाणे बंद केल्याचे दिपाली त्यागी या महिलेने म्हटले आहे. पिझ्झा आउटलेटच्या एका व्यवस्थापकाने दिपाली यांना फोन करून तक्रारदाराच्या पूर्ण कुटुंबाला मोफत पिझ्झा देण्याचे आश्वासन दिले होते.

Related Stories

भारताला मिळाले आणखी एक यश

Patil_p

पैशाचा खणखणाट…प्रेतामुळे घबराट

Patil_p

जम्मू-काश्मीरच्या ‘या’ जिल्ह्यांमध्ये येतेय पाकिस्तानी कंपन्यांचे मोबाईल नेटवर्क

datta jadhav

तमुलपूरमधील निवडणूक स्थगित करा

Patil_p

National Doctor’s Day 2021: पीएम मोदी दुपारी 3 वाजता डॉक्टरांना करणार संबोधित

triratna

पुलवामा : सुरक्षा दलांवर दहशतवाद्यांकडून गोळीबार

datta jadhav
error: Content is protected !!