तरुण भारत

सोलापूर : बंधाऱ्यात अकरा दिवस पुरेल इतकेच पाणी

औज व चिंचपूर बंधाऱ्यातील पाण्याची पातळी खालावली

महापालिकेचे पाटबंधारे विभागाला पत्र; वेळेत पाणी नाही सोडले तर येणार अडचण

प्रतिनिधी/सोलापूर

Advertisements

सोलापूर शहर हद्दवाढ भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या औज व चिंचपूर बंधाऱ्यातील पाण्याची पातळी खालावत चालली आहे. अवघे अकरा दिवस म्हणजेच 25 मार्चपर्यंत पुरेल इतकेच पाणी बंधाऱ्यात उपलब्ध आहे. शहरासाठी पाणी सोडण्याबाबतचे पत्र महापालिका प्रशासनाने पाटबंधारे विभागाला दिल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी संजय धनशेट्टी यांनी दिले.

दरवषी उन्हाळ्यात पाणीटंचाई सोलापूरकरांच्या नशिबी आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे बाष्पीभवन होऊन पाणी घटण्याचे प्रमाण अधिक असते. पाऊस जास्त झाले तरी साठवणूक क्षमताच नसल्याने अतिरिक्त पाणी वाहून जाते. त्यामुळे पाऊस जास्त असो की कमी सोलापूर शहराला पाणी समस्या कायम भेडसावत असते. उन्हाळ्यात पाण्याची कमी जाणवत असल्याने तर पावसाळ्यात पाणी मुबलक असताना प्रशासनाची अंतर्गत वितरण व्यवस्था सुरळीत नसल्याने शहराचा पाणीप्रश्न कायम आहे.

मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच सूर्यनारायणाने आग ओकण्यास सुरुवात केल्याने पाण्याची पातळी घटत आहे. यापूर्वी 25 जानेवारी रोजी उजनी धरणातून सोलापूरसाठी पाणी सोडण्यात आले होते. दोन्ही बंधारे पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर शहराची 55 दिवसांची तहान भागते. आजमितीला बंधाऱयामध्ये शहरवासियांची 11 दिवसांची तहान भागेल इतकेच पाणी आहे. त्यामुळे शहराला उजनी धरणातून पाणी सोडण्यात यावे, असे महापालिकेने पाटबंधारे विभागाला पत्राद्वारे कळविले आहे. वेळेत पाणी सोडल्यास शहराला नियमित पाणी मिळेल अन्यथा शहरवासियांना पाणी संकटाला सामोरे जावे लागणार आहे.

Related Stories

माढा तालुक्यातील घाटणेत शेतीच्या वादातून खून, तीन आरोपींना ४८ तासात अटक

Abhijeet Shinde

सोलापुरातील टेली आयसीयूचे ऑनलाईन लोकार्पण

Abhijeet Shinde

पंढरपूर शहरासह आजूबाजूच्या नऊ गावांमध्ये संचारबंदी – जिल्हाधिकारी

Abhijeet Shinde

सोलापूर : ११८ जण कोरोनामुक्त, शहरात नव्याने ३४ पॉझिटिव्ह रुग्ण तर दोघांचा मृत्यू

Abhijeet Shinde

टाळेबंदीनंतर प्रथमच पंढरपूरची कार्तिकी यात्रा भरणार

Abhijeet Shinde

सोलापूर ग्रामीणमध्ये कोरोनाने 10 जणांचा मृत्यू, 344 पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde
error: Content is protected !!