तरुण भारत

युवराज सिंगचे सलग 4 षटकार

वृत्तसंस्था/ रायपूर

येथे सुरू असलेल्या रोड सेफ्टी विश्व टी-20 क्रिकेट स्पर्धेतील सामन्यात इंडिया लिजेंड्स संघाकडून खेळताना भारताचा माजी अष्टपैलू युवराज सिंगने केवळ 22 चेंडूत 52 धावा झोडपताना सलग चार षटकार खेचले. या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 57 धावांनी पराभव केला.

Advertisements

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंडिया लिजेंड्सने 20 षटकांत 3 बाद 204 धावा जमविल्या. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने 20 षटकांत 7 बाद 148 धावा जमविल्या.

भारतातर्फे सचिन तेंडुलकरने 37 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारांसह 60 धावा, युवराज सिंगने 22 चेंडूत 6 षटकार आणि 2 चौकारांसह 52 धावा जमविल्या. बद्रीनाथने 34 चेंडूत4 चौकार आणि 2 षटकारांसह 42, युसूफ पठाणने 23, मनप्रित गोनीने 16 धावा जमविल्या. दक्षिण आफ्रिकेच्या झोंडेकीने 2 गडी बाद केले. दक्षिण आफ्रिकेच्या डावात पुटीकने 41 तर व्हॅन वेकने 48 धावा जमविल्या. युसूफ पठाणने 3 तर युवराज सिंगने 2 गडी बाद केले. या सामन्याला सुमारे 50,000 शौकिन उपस्थित होते.

Related Stories

गुड न्यूज : अनुष्का-विराट आई-बाबा बनणार !

Rohan_P

रूमानियाची हॅलेप अंतिम फेरीत

Patil_p

भारताचा हॉलंडवर एकतर्फी विजय

Patil_p

कोरोना क्वारंटाईनसाठी ईडन गार्डन्सचा वापर

Patil_p

न्यूझीलंडचा पाकवर पाच गडय़ांनी विजय

Patil_p

भारतीय फलंदाजांच्या मार्गदर्शनासाठी द्रविडला ऑस्ट्रेलियाला पाठवावे : वेंगसरकर

Patil_p
error: Content is protected !!