तरुण भारत

आशियाई स्पर्धेत बिलीयर्ड्सचे पुनरामन

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

2030 साली डोहा कतार येथे होणाऱया आशियाई क्रीडा स्पर्धेत क्यू स्पोर्ट्स म्हणजे बिलीयर्ड्स या क्रीडाप्रकाराचे पुनरागमन होणार असल्याची घोषणा आशियाई बिलीयर्ड्स स्पोर्ट्स कॉन्फडरेशनने रविवारी केली आहे.

Advertisements

या खंडीय क्रीडास्पर्धेत तब्बल 20 वर्षांनंतर बिलीयर्ड्सचा पुन्हा समावेश होत आहे. 2030 साली डोहा येथे होणाऱया आशियाई क्रीडास्पर्धेत बिलीयर्ड्स या क्रीडाप्रकाराचा सहभाग राहील. यापूर्वी म्हणजे 1998 ते 2010 या कालावधीत झालेल्या सलग चार आशियाई क्रीडास्पर्धेत बिलीयर्ड्स या क्रीडाप्रकाराचा समावेश होता. त्यानंतर मात्र या क्रीडाप्रकाराला सदर स्पर्धेतून वगळण्यात आले. बिलीयर्ड्स या क्रीडाप्रकारात भारताने चार आशियाई क्रीडास्पर्धेत पाच सुवर्णासह एकूण 15 पदकांची कमाई केली होती. गीत सेठी आणि पंकज आडवाणी हे आशियाई स्पर्धेतील हे सुवर्णपदक विजेते आहेत.

Related Stories

युपी, हरियाणाची हॉकीत चमक

Patil_p

ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेला विलंब नाही

Patil_p

जुर्गेन क्लॉप सर्वोत्तम व्यवस्थापक

Patil_p

भारतीय क्रिकेट संघाला एका गुणाचा दंड

Patil_p

दोन ‘रॉयल्स’ संघ आज पुन्हा आमनेसामने

Patil_p

नेदरलँडस्ची एकतर्फी बाजी

Patil_p
error: Content is protected !!