तरुण भारत

बायोमेडिकल वेस्ट प्रकल्पाच्या टक्केवारीसाठी लडतरी

प्रतिनिधी/ सातारा

शहरातील 25 हॉस्पिटलमध्ये तयार होणारा जैविक कचरा नष्ट करण्यासाठी सातारच्या सोनगाव कचरा डेपोत दि. 12 मार्च 2007 रोजी 40 गुंठे जागा दिली होती. त्या जागेत जैविक कचरा निर्मूलन भट्टी बांधण्यात आली. या भट्टीचे काम सध्या नेचर निड ही संस्था पहाते. अगदी सातारा शहराबरोबरच जिह्यातील जैविक कचरा ही येथे नष्ट करण्यात येतो. त्या संस्थेला मुदतवाढ दि. 28 ऑगस्ट 2021 पर्यत दिल्याचे एका दस्तऐवजावर उल्लेख आहे, तर पालिकेतल्या उचापतीनी बगलबच्यांच्या सोयीसाठी वेगळीच कागदपत्रे तयार करून टक्केवारीसाठी अन्य एका संस्थेला देण्याचा घाट घातला गेला आहे. आरोग्य विभागात कचऱयातून मिळतोय खाऊ आपण सगळेच मिळून लुटू अशी आरोग्य विभागाची परिस्थिती असल्याने स्वच्छ सर्व्हेक्षण नंबर येईल कसा अशा चर्चा रंगू लागल्या आहेत.

Advertisements

शहर स्वच्छ आणि सुंदर बनवण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन असायला लागतो. मात्र, येथे तर साधल्याचे सोबती होणारे पहायला मिळतात. शहर जिह्याचे ठिकाण असल्याने शहरात मोठी सुमारे 25 हॉस्पिटल आणि इतर छोटीमोठी 50 हुन अधिक हॉस्पिटल आहेत. या हॉस्पिटलमधील जैविक कचरा हा नष्ट करण्यासाठी सातारा पालिकेच्या सोनगाव कचरा डेपोत उत्तर बाजूला 40 गुंठे जागा वैद्यकीय व्यावसायिक संघटनेच्या दि. 5 एप्रिल 2002 च्या पत्रानुसार तात्पुरती देण्यात आली. दि. 8 एप्रिल 2003 च्या संघटनेच्या पत्रानुसार जैविक कचरा निर्मूलन करण्यासाठी कायमस्वरूपात प्लँट तयार करण्यासाठी जागा मिळावी, अशी विनंती केली होती. त्यानुसार संघटनेला 20 गुंठे जागा दिली होती. दि. 21 जून 2006 ला शहर वैद्यकीय संघटनेने प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पत्रानुसार 20 गुंठे जागेची मागणी केली होती. त्यानुसार दि. 27 डिसेंबर 2006 च्या विशेष सभेतील ठराव क्र.7 नुसार त्या प्लँटला दि. 12 मार्च 2007 ते दि. 11 मार्च 2010 या कालावधीकरीता तीन वर्षांच्या मुदतीत देण्यात आली. त्यानंतर मार्च 2010 ते मार्च 2013 अशी मुदतवाढ दिली. दि. 27 मे 2013 ला शहर वैधकीय संघटनेने पुन्हा मुदतवाढ मागितली. त्यानुसार दि.30 जुलै 2013 ते दि. 19 जुलै 2016 अशी मुदतवाढ दिली अन त्यानंतर दि. 28 ऑगस्ट 2018 ला पुन्हा मुदतवाढ देण्यात आल्याचा ठराव पालिकेच्या दि. 23 जानेवारी 2019 च्या सर्वसाधारण सभेत ठराव क्रमांक 354 नुसार मंजुरी देण्यात आली. त्या कराराची मुदत दि. 28 ऑगस्ट 2021 ला संपत आहे. असा सर्व एका पालिकेच्या दस्तऐवजात उल्लेख आहे.

असे असताना पालिकेच्या आरोग्य विभागाच्या खटपटी अधिकाऱयांनी काही पदाधिकाऱयांच्या गोतावळा जोपासना करण्यासाठी पुन्हा त्याच एक एकर जागेवर डोळा ठेवून बगलबच्याचा खिसा गरम करण्यासाठी पुन्हा नवीन कागद दि. 1 जानेवारी 2021 रोजी रंगवला. कागदावर चक्क 2016 ला करार संपल्याचे नमूद केले असून ती जागा तो प्रकल्प एनव्ही सेफ या संस्थेला चालवण्यास देण्याचा घाट घातला असून नेचर निड या संस्थेला निटसे काम करता येत नाही असे म्हटले आहे. मुळात काही कागदपत्रे असे सांगतात की अद्याप मुदतवाढ संपली नाही तरीही एनव्ही सेफ सोल्युशन या संस्थेच्या गळ्यात बायोमेडिकल वेस्टचा प्रकल्प मारण्याचा नेमका कशासाठी सुरू आहे. असा सवाल उपस्थित होत आहे. काही पदाधिकारी त्यांच्या कार्यकर्त्यांचे खिसे गरम करण्यासाठी ही उचापती चालल्या आहेत. त्यामुळे नेमकी एनव्ही सेफ ही संस्था कोणाच्या जवळची कोणाला आतून टक्केवारी मिळवणार कोणाचा खिसा गरम होणार याचीच चर्चा सुरू आहे.

प्रदूषण नियंत्रण मंडळांच्या पत्राचे गौडबंगाल?

सुरुवातीला पालिकेच्याच सभेत ठराव करून बायो मेडिकल वेस्ट प्रकल्पाला जागा दिली.प्रकल्प उभा राहिला तो प्रकल्प नेचर निड ही संस्था चालवत आहे. 2020 मध्ये पुणे येथून आलेल्या जैविक कच्रयाची तक्रार झाली होती. त्यानंतर मात्र, नेचर निड या संस्थेची थेट उचल बांगडी करण्यासाठी चक्क जोडण्यात आलेले महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रमाणपत्राबाबत संशय निर्माण होत आहे.

बायो मेडिकल वेस्ट पडतेय रस्त्यावरच

शहरात ज्या कारणास्तव बायोमेडिकल वेस्टचा प्रकल्प सुरू केला आहे. त्या कारण काही ठिकाणी बाजूला ठेवले जात आहे. नियमित गोळा करणाया काही घंटा गाडय़ात जैविक कचरा पडत असल्याचे कित्येक प्रकार उघडकीस आले आहेत. तसेच शहरात सध्या काही ठिकाणी जैविक कचरा पडतो.असा जैविक कचरा पडल्यास संबंधित व्यक्तीवर 1 लाख रुपयांचा दंड अशी शिक्षा आरोग्य विभाग करू शकतो परंतु आज पर्यत आरोग्य विभागाने असा दंड केल्याचे कुठे ही गाजावाजा केला नाही. त्याचे ही नवलच आहे.

Related Stories

शहरातील सर्व दुकाने आजपासून सम-विषम तारखांना उघडणार

Abhijeet Shinde

सांगली: बागणी, काकाचीवाडी येथील रेशनिंग दुकानावर कारवाई

Abhijeet Shinde

नक्षलवाद्यांनी एकाच कुटुंबातील चौघांना लटकवले फासावर

datta jadhav

मनी लॉड्रिंग प्रकरण : अनिल देशमुखांकडून गंभीर आरोप

Abhijeet Shinde

रिफायनरीला राजापूर तालुका जनता परिषदेचा पाठिंबा

Amit Kulkarni

अखेर केंद्राच्या पथकाने मेडिकल कॉलेजची केली पाहणी

Patil_p
error: Content is protected !!