तरुण भारत

संगणक परिचालकांना लवकरच ग्रामपंचायत स्तरावर कर्मचारी म्हणून नियुक्त करू – हसन मुश्रीफ

प्रतिनिधी / असळज

राज्यातील ग्रामपंचायतीचे काम करणाऱ्या संगणक परिचालकांना लवकरच ग्रामपंचायत स्तरावर कर्मचारी म्हणून नियुक्त करू असे लेखी आश्वासन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी मुंबई येथे दिलेची माहिती संगणक परिचालक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश कांबळे यांनी दिली. याबद्दल हसन मुश्रीफ यांचा कोल्हापूर संघटनेमार्फत सत्कार करण्यात आला.

Advertisements

गेले अठरा दिवस ग्रामपंचायत संगणक परिचालक संघटनेचे मुंबई येथे आझाद मैदान येथे आंदोलन होते. यावेळी मोर्चा, निदर्शने हि मोठ्या प्रमाणात झाली. याची दखल विधानसभेतही घेण्यात आली होती. संगणक परिचालक गावोगावी डिजीटल महाराष्ट्र घडविण्यात मोलाची भूमिका बजावतो. ग्रामीण ऑनलाइन यंत्रणेचा मुलभूत पाया हा संगणक परिचालक आहे. त्यामुळे त्यांच्या आंदोलनाने सर्व ऑनलाइन कामकाज ठप्प झाले होते. यासाठी सुधारित आकृतीबंधानुसार ग्रापंचायत स्तरावर एक संगणक परिचालक कायमस्वरूपी नेमणे गरजेचे आहे अशी शिफारस या समितीने केली होती. परंतु राज्य सरकारने तो अहवाल स्वीकारला नव्हता. तो अहवाल स्वीकारून ग्रामविकास विभागाने त्यास मान्यता दिली आहे. याबाबत हसन मुश्रीफ यांनी शिस्टमंडळासोबत बैठक घेवून सामान्य प्रशासन व अर्थ विभागाकडे फाईल पाठवली आहे. लवकरच संगणक परीचालाकाना ग्रामपंचायत स्तरावर कर्मचारी दर्जा देण्याचे लेखी पत्र हसन मुश्रीफ यांनी संघटनेला दिले आहे.

याबाबत कोल्हापूर संगणक परिचालक संघटनेने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अध्यक्ष प्रकाश कांबळे, नियाज तहसीलदार, नियाज देसाई, तेजस्विनी पाटील, दिपाली चौगुले, अवधूत पाटील, अनिल उन्हाळे व राधानगरी, कागल, गडहिंग्लज,आजरा, चंदगड, शिरोळ, मिरज, वाळवा, शाहूवाडी भागातील संगणक परिचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Stories

सांगली : कारागृहात उद्रेक, 62 कैदी पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

कोल्हापूर : नृसिंहवाडीत दक्षिणद्वार सोहळा संपन्न

Abhijeet Shinde

सांगली : कत्तलखाना, कचरा डेपामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात

Abhijeet Shinde

भुदरगड मध्ये मराठा समाजामार्फत पाटगाव ते आदमापूर संघर्ष यात्रा

Abhijeet Shinde

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संस्थांना राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान पुरस्कार देऊन गौरविणार

Abhijeet Shinde

ऊस तोडणी-ओढणीच्या कर्जांची चौकशी

Abhijeet Shinde
error: Content is protected !!