तरुण भारत

सांगली : केंद्रीय परिवहन मंत्र्यांच्या वाढदिवसादिवशी सामूहिक आत्मदहनाचा इशारा

छत्रपती शिवाजी रस्त्यासाठी मिरज सुधार समिती आक्रमक, आमदार, खासदारांच्या कार्यालयासमोरही आंदोलन करणार

प्रतिनिधी / मिरज
शहरातील छत्रपती शिवाजी रस्त्याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभाग केवळ चालढकल करीत आहे. आमदार व खासदार केवळ मिरजकरांना गाजर दाखवित असल्याने त्यांच्या कार्यालयासमोर सुधार समिती आंदोलन करणार असल्याचे तसेच केंद्रिय परिवहन व राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या २७ मे रोजी वाढदिवसादिवशी महात्मा गांधी चौकात समितीचे कार्यकर्ते सामुहिक आत्मदहन करणार असल्याचा इशारा समितीने दिला आहे.
समितीचे जावेद पटेल म्हणाले, आमदार सुरेश खाडे यांनी रस्त्यासाठी १०० कोटींचा निधी आणल्याचे सांगत पोस्टरबाजी व पेपरबाजी केली. मात्र, त्यांनी मिरजकरांची घोर फसवणूक केली आहे. तर, खासदार संजयकाका पाटील हे ब्रशब्दही काढत नाहीत. ही मिरजकरांची हेडसाळणी आहे. या विरोधात समिती लोकप्रतिनिधींच्या कार्यालयासमोर आंदोलन करून त्यांना जाब विचारणार आहे. तर, २७ मेपर्यंत रस्त्याबाबत ठोस निर्णय न झाल्यास समितीच्या कार्यकर्ते केंद्रिय परिवहन व राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या २७ मे रोजी वाढदिवसादिवशी महात्मा गांधी चौकात सामुहिक आत्मदहन करणार आहेत.

Advertisements

Related Stories

सांगली : सराईत गुंड भावश्या पाटीलला सक्तमजुरीची शिक्षा

triratna

बस्तवडेला शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्राची मंजुरी नाही : मंत्री सामंत

triratna

दिघंचीत आरोग्य सेविकेच्या घरावर चोरट्यांचा डल्ला, सुमारे चार तोळे सोने लंपास

triratna

तासगाव तालुक्यात चार नवे रूग्ण

triratna

खानापूर तालुक्यातील 33 गावात महिला असणार सरपंच

triratna

सांगली युवक काँग्रेसच्यावतीने बेरोजगार दिन जाहीर करत आंदोलन

triratna
error: Content is protected !!