तरुण भारत

अयोध्या : राम मंदिराच्या पायाभरणीस प्रारंभ

ऑनलाईन टीम / अयोध्या : 

अयोध्येतील राम मंदिराच्या पायाभरणीला आजपासून सुरुवात झाली. सकाळी 10 वाजून 55 मिनिटांच्या शुभ मुहूर्तावर राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे जनरल सेक्रेटरी चंदपत राय यांनी वैदिक प्रथांमध्ये पायाभरणीपूर्वी पूजा केली. राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे विश्वस्त डॉ. अनिल मिश्रा, निर्मोही आखाड्याचे महंत दिनेंद्र दास, विमलेंद्र मोहन प्रताप मिश्रा, जिल्हा अधिकारी अनुजकुमार झा आदी यावेळी उपस्थित होते.

Advertisements

राम जन्मभूमी परिषदेच्या पाच एकर जमिनीवर राम मंदिराचे बांधकाम सुरू आहे. ज्यामध्ये गर्भाच्या जागेसह संपूर्ण 2.77 एकर जमिनीत 40 फूट खोल उत्खननाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामध्ये 1 फूट जाडीच्या काँक्रिटच्या थराने राम मंदिराच्या बांधकामाचा पाया सुरू करण्यात आला आहे.

मंदिराच्या पायाभरणीसाठी वास्तूशास्त्रानुसार मुहूर्त काढण्यात आला आहे. चैत्र कृष्ण त्रयोदशीला म्हणजेच 9 एप्रिलला मंदिराची पायाभरणी होईल. तत्पूर्वीच मंदिराच्या बांधकामासाठी लागणारे सिमेंट, मुरूम आणि माती मागविण्यात आली आहे. 

Related Stories

कोरोनाचा विळखा घट्ट

tarunbharat

‘आयर्न मॅन’ नायिकेजवळ कोरोनाचा रामबाण उपाय?

Patil_p

घरी परतणाऱ्या मजुरांना काँग्रेसकडून मदतीचा ‘हात’

Rohan_P

पंतप्रधान मोदींनी दहा राज्यांमधील जिल्हाधिकाऱ्यांशी साधला संवाद

Abhijeet Shinde

भारतात मागील 24 तासात 28,637 नवे कोरोना रुग्ण, 551 मृत्यू

datta jadhav

सिंघू हत्या प्रकरणी तिघांना पोलीस कोठडी

Patil_p
error: Content is protected !!