तरुण भारत

सातारा : आनेवाडी टोलनाक्यावर स्थानिकांचा राडा

कुडाळ : वादग्रस्त टोलनाका म्हणून ओळख असणाऱ्या आनेवाडी टोल नाक्यावर रविवारी रात्री अज्ञात टोळक्याने टोल कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, काल रविवार सुट्टीचा दिवस असल्याने आनेवाडी टोल नाक्यावर वाहनांची तुफान गर्दी होती. टोल वसुलीसाठी टोल कर्मचारी सक्तीची टोल वसुली करत असतानाच पुण्याच्या दिशेने जाणारी इर्टीगा गाडी दोन कर्मचाऱ्यांनी नोंद घेण्यासाठी आडवली असता, चालकाने गाडी थेट टोल कर्मचाऱ्यांच्या अंगावर घातली.  या प्रकारामुळे इर्टीगा गाडीमधून प्रवास करणारी महिला प्रवासी व दोन कर्मचारी यांच्यात जोरदार वाद झाले.
वादाचे रूपांतर अचानकच काही तासानंतर तुफान हाणामारीमध्ये  झाले. सदर महिला वाहनचालक ह्या भोर तालुक्यातल्या होत्या. त्यांच्या मदतीसाठी काही स्थानिक युवकांच टोळकं त्याठिकाणी आलं. महिला प्रवासाला उद्धट वर्तन केले हे कारण देत या टोळक्याने दोन कर्मचाऱ्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. जोरदार धुमश्चक्री झाल्यानंतर  हे सर्व प्रकरण भुईंज पोलिस स्थानकामध्ये गेले. रात्री उशिरापर्यंत हा सर्व लवाजमा पोलिस तक्रारीसाठी उपस्थित होता. मात्र रात्री उशिरापर्यंत या संदर्भात तक्रार दाखल झाली नसल्याची माहिती समोर येत आहे. 

Advertisements

दरम्यान स्थानिक युवकांचा टोळकं नेमकं कोणत्या गावाचं होतं याबाबत अद्याप माहिती समोर आली नाही. सार्वजनिक ठिकाणी अशा पद्धतीने हाणामारी करत वातावरण तंग करणे असे प्रकार आनेवाडी टोल नाक्यावर सातत्याने घडत असतात. यावर कायमस्वरूपी उपाय योजना करावी, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे.

Related Stories

सातारा : अपघातावरून दुचाकी चालकावर गुन्हा दाखल

Abhijeet Shinde

रूई येथील ‘त्या’ बेपत्ता बहीण भावाचे मृतदेह निरा उजव्या कालव्यात सापडले

Abhijeet Shinde

जिल्हा रूग्णालयात सर्वांची एकाच ठिकाणी तपासणी

Amit Kulkarni

पालिकेच्या सभेला सापडला मुहूर्त

datta jadhav

सातारा : होम आयसोलेट ८,७४५ जण बरे

Abhijeet Shinde

आंतरजिल्हा सराईत टोळी शिरवळ पोलिसांकडून जेरबंद

datta jadhav
error: Content is protected !!