तरुण भारत

श्वान अन् महिलेसोबत राहतो ब्लॅक पँथर

सायबेरियातील लूना नावाच्या ब्लॅक पँथरला तिच्या आईने त्यागले होते. तेव्हापासून हा ब्लॅक पँथर एक श्वान आणि महिलेसोबत राहत आहे. या महिलेनेच या ब्लॅक पँथरला वाचविले होते. या महिलेने यापूर्वीच अनेक बिग कॅट्सना वाचविले आहे. याचमुळे तिला ब्लॅक पँथरचा आहार आणि त्याची पूर्ण काळजी घेणे जमत आहे.

लूना या ब्लॅक पँथरसोबत या महिलेचे आता भावनिक नाते जोडले गेले होते, याचमुळे तिने प्राणिसंग्रहालयाकडून त्याची खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. आपल्यापेक्षा ही महिला अधिक चांगल्याप्रकारे ब्लॅक पँथरची काळजी घेईल हे प्राणिसंग्रहालयाचे व्यवस्थापनही ओळखून होते.

Advertisements

लूना मादी ब्लॅक पँथर असून ती वेंजा नावाच्या रोटवेईलर श्वानासोबत राहते. इस्टाग्रामवर लूनाचे एक पेजही तयार करण्यात आले आहे. यात तिची छायाचित्रे-चित्रफिती प्रसारित केल्या जातात. लूना आणि वेंजा खूप धमाल करतात.

वेंजा आणि लूना दोघांच्याही आहारची ही महिला मोठी काळजी घेते. तिने लूनाला बाटलीच्या माध्यमातून दूध पाजले आहे. लूना आता मोठी होऊ लागल्याने तिला मांसाहारही देण्यात येत आहे. या तिघांनाही एकत्र पाहून एक कुटुंब असल्याचा भास होतो.

Related Stories

सरकारसोबतचा वाद संपविणार केयर्न एनर्जी

Patil_p

ब्रिटनमध्ये दुसरी लाट

Patil_p

चीनविरोधात बायडेन यांचे पहिले पाऊल

Amit Kulkarni

अफगाणिस्तानात रॉकेट हल्ला, गनी होते लक्ष्य

Patil_p

मृत शरीराला वृक्षात बदलणारी कंपनी

Patil_p

थायलंड : संसर्ग रोखला

Patil_p
error: Content is protected !!