तरुण भारत

विनायक राऊत यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

देशातील सर्वोत्कृष्ट खासदारांपैकी एक! – पालकमंत्री उदय सामंत यांचे गौरवोद्गार

प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:

Advertisements

विनायक राऊत हे देशातील सर्वोत्कृष्ट खासदारांपैकी एक आहेत. राजकारणापेक्षा समाजकारणाला प्राधान्य देऊन रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हय़ात खऱया अर्थाने विकासाला चालना देण्याचे काम राऊत यांनी केले, असे गौरवोद्गार सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सोमवारी काढले.

खासदार राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त पालकमंत्री सामंत यांनी त्यांच्या तळगाव येथील निवासस्थानी भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार वैभव नाईक, संदेश पारकर, जि. प. गटनेते नागेंद्र परब, जि. प. माजी अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, बाबा आंगणे, छोटू पारकर, अवधूत मालणकर, जि. प. सदस्य प्रदीप नारकर, प्रभाकर परब उपस्थित होते. राजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजन साळवी यांनीही तळगाव येथे राऊत यांच्या निवासस्थानी येऊन शुभेच्छा दिल्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने जिल्हाध्यक्ष अमित सामंत, काका कुडाळकर व अन्य पदाधिकाऱयांनीही शुभेच्छा दिल्या.

पालकमंत्री उदय सामंत, आमदार वैभव नाईक, संदेश पारकर यांनी शुभेच्छा देताना सांगितले की, खासदार विनायक राऊत यांनी 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळविल्यानंतर सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्हय़ात विकासाला चालना मिळाली. राजकारण बाजूला ठेवून त्यांनी अनेक विकासकामे केली. विशेष म्हणजे शासकीय मेडिकल कॉलेज मंजूर करून आणले. जिल्हय़ाच्या आरोग्याच्या दृष्टीने ही मोठी उपलब्धी आहे.

देवगड तालुका शिवसेनेच्यावतीने हापूस आंब्यांचा हार घालून खासदार राऊत यांना गौरविण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, कुडाळ प्रांताधिकारी वैशाली खरमाळे तसेच विविध खात्यांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते यांनीही राऊत यांना शुभेच्छा दिल्या. अगदी सकाळपासूनच शुभेच्छा देण्यासाठी राऊत यांच्या निवासस्थानी जनतेची रेलचेल सुरू होती.

Related Stories

दापोलीतील 65 वर्षीय वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू

Patil_p

वाघिवरे मोहल्ल्यात गोवंश हत्या करणाऱ्या चौघांना रंगेहात पकडले

Abhijeet Shinde

रिक्त वैद्यकीय पदांबाबत उपाययोजना सूचवा!

Patil_p

एलएनटी-शिवसेनेतील वाद तहसीलदारांच्या कोर्टात

Patil_p

भोवड खून प्रकरणी गांजा विक्रीचे कनेक्शन?

Patil_p

‘माझे कुटुंब…’रंगलय फक्त कागदावर!

Patil_p
error: Content is protected !!