तरुण भारत

विंडीजकडून लंकेचा वनडे मालिकेत ‘व्हाईट वॉश’

वृत्तसंस्था/  ऍटीग्वा

यजमान विंडीजने लंकेविरूद्धची तीन सामन्यांची वनडे मालिका 3-0 अशी एकतर्फी जिंकली. रविवारी येथे झालेल्या या मालिकेतील शेवटच्या सामन्यात डरेन ब्रॅव्होच्या शानदार शतकाच्या जोरावर विंडीजने लंकेचा 5 गडय़ांनी पराभव केला.

Advertisements

या शेवटच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना लंकेने 50 षटकांत 6 बाद 274 धावा जमविल्या. त्यानंतर विंडीजने 48.3 षटकांत 5 बाद 276 धावा जमवित विजय नोंदविला. शतकवीर डरेन ब्रॅव्होला ‘सामनावीर’ तर विंडीजच्या शाय होपला ‘मालिकावीर’ म्हणून जाहीर करण्यात आले.

लंकेच्या डावात आठव्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱया पी. डिसिल्वाने 60 चेंडूत 3 षटकार आणि 5 चौकारांसह नाबाद 80 तर बंदाराने 74 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह नाबाद 55 धावा झळकविताना सातव्या गडय़ासाठी अभेद्य 123 धावांची भागिदारी केली. तत्पूर्वी गुणतिलका आणि कर्णधार करूणारत्ने यांनी सलामीच्या गडय़ासाठी 68 धावांची भर घातली होती. गुणतिलकाने 38 चेंडूत 6 चौकारांसह 36 तर कर्णधार करूणारत्नेने 46 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 31, निशांकाने 25 चेंडूत 3 चौकारांसह 24, चंडीमलने 2 चौकारांसह 16, शनाकाने 27 चेंडूत 1 चौकारांसह 22 आणि पी. परेराने 3 धावा जमविल्या. लंकेच्या डावात 5 षटकार आणि 23 चौकार नोंदविले गेले. विंडीजतर्फे जोसेफने 51 धावांत 1, मोहम्मदने 49 धावांत एक आणि अकिल हुसेनने 33 धावांत 3 गडी बाद केले.

प्रत्युत्तरादाखल खेळताना विंडीजच्या डावात डरेन ब्रॅव्होने 132 चेंडूत 4 षटकार आणि 5 चौकारांसह 102, शाय होपने 72 चेंडूत 2 षटकार आणि 3 चौकारांसह 64, लेवीसने 13, जेसन मोहम्मदने 8, पुरनने 2 षटकारांसह 15, कर्णधार पोलार्डने 42 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह नाबाद 53 आणि होल्डरने 10 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारांसह नाबाद 14 धावा जमविल्या. विंडीजच्या डावात 10 षटकार आणि 16 चौकार नोंदविले गेले. लंकेतर्फे लकमलने 2 तर पी. डिसिल्वा, टी. परेरा आणि गुणतिलका यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. विंडीजच्या डरेन ब्रॅव्होचे वनडेतील हे चौथे शतक आहे. 13 महिन्यापूर्वी झालेल्या वनडे मालिकेत लंकेने विंडीजचा पराभव केला होता. या पराभवाची परतफेड विंडीजने या मालिकेत केली. पोलार्डच्या नेतृत्वाखाली विंडीजने लंकेविरूद्धची टी-20 मालिका 2-1 अशा फरकाने यापूर्वी जिंकली आहे. आता उभय संघातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला येत्या रविवारी येथे प्रारंभ होत आहे.

संक्षिप्त धावफलक ः लंका 50 षटकांत 6 बाद 274 (पी. डिसिल्वा नाबाद 80, बंदारा नाबाद 55, गुणतिलका 36, करूणारत्ने 31, निशांका 24, चंडीमल 16, शनाका 22, टी. परेरा 3, अकिल हुसेन 3-33, जोसेफ 1-51, मोहम्मद 1-49). विंडीज 48.3 षटकांत 5 बाद 276 (डरेन बॅव्हो 102, लेवीस 13, हॉप 64, मोहम्मद 8, पुरण 15, पोलार्ड नाबाद 53, होल्डर नाबाद 14, लकमल 2-56, पी. डिसिल्वा 1-49, टी. परेरा 1-27, गुणतिलका 1-28).

Related Stories

इंग्लंडचा बांगलादेश दौरा 2023 मार्चमध्ये

Patil_p

टी-20 मालिकेसाठी भारत-द. आफ्रिका अनुकूल

Patil_p

निवड चाचणी ठरणार महाराष्ट्र केसरीची रंगीत तालीम!

datta jadhav

आशियाई मुष्टियुद्ध चॅम्पियनशिप आजपासून

Patil_p

हनुमा विहारीऐवजी जडेजाला संधी शक्य

Patil_p

हॉकी इंडियाच्या पॅनेलमध्ये नवे पंच, तांत्रिक अधिकाऱयांचा समावेश

Patil_p
error: Content is protected !!