तरुण भारत

एटीपी मानांकनात मेदव्हेदेव दुसऱया स्थानी

वृत्तसंस्था/  पॅरीस

सोमवारी घोषित करण्यात आलेल्या एटीपीच्या ताज्या मानांकनात रशियाचा  25 वर्षीय डॅनिल मेदव्हेदेवने दुसऱया स्थानावर झेप घेतली आहे. या ताज्या यादीत सर्बियाचा जोकोव्हिच पहिल्या स्थानावर कायम आहे.

Advertisements

गेल्या महिन्यात झालेल्या ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेत रशियाच्या मेदव्हेदेवला जोकोव्हिचने अंतिम फेरीत पराभूत केले होते. मेदव्हेदेवने मार्सेली येथे झालेल्या टेनिस स्पर्धेत जेतेपद मिळविताना हर्बर्टचा पराभव केला. या जेतेपदामुळे मेदव्हेदेवने एटीपीच्या मानांकनात स्पेनच्या नदालला दुसऱया स्थानावरून खाली खेचले. एटीपीच्या मानांकन यादीत गेल्या 16 वर्षांच्या कालावधीत दुसरे स्थान मिळविणारा मेदव्हेदेव हा रशियाचा पाचवा टेनिसपटू आहे.

एटीपीच्या ताज्या मानांकन यादीत सर्बियाचा जोकोव्हिच 12008 मानांकन गुणांसह पहिल्या, रशियाचा मेदव्हेदेव 9940 गुणांसह दुसऱया, स्पेनचा नदाल 9670 गुणांसह तिसऱया, ऑस्ट्रीयाचा थिएम 8625 गुणांसह चौथ्या, ग्रीकचा  सित्सिपस 6765 गुणांसह पाचव्या, स्वीसचा फेडरर 6375 गुणांसह सहाव्या, जर्मनीचा ऍलेक्झांडर व्हेरेव्ह 5635 गुणांसह सातव्या, रशियाचा रूबलेव्ह 5011 गुणांसह आठव्या, अर्जेंटिनाचा शुवार्त्झमन 3640 गुणांसह नवव्या आणि इटलीचा बेरेटेनी 3453 गुणांसह दहाव्या स्थानावर आहे.

Related Stories

रशियाचा रूबलेव्ह उपांत्यपूर्व फेरीत

Amit Kulkarni

एकतर्फी विजयासह दिल्ली पुन्हा ‘टॉप’वर

Patil_p

शफालीचे दुसऱया डावातही अर्धशतक

Patil_p

अमेरिकेची गॉफ अजिंक्य

Patil_p

ऑस्ट्रेलियन पथक सोमवारी मायदेशी रवाना होणार

Patil_p

भवानीपूरकडून बेंगळूर युनायटेड पराभूत

Patil_p
error: Content is protected !!