तरुण भारत

तापमान वाढ कायम

प्रतिनिधी/ सातारा

 गेल्या काही दिवसांपासुन उन्हाच्या झळा या आणखीनच तीव्र बसु लागल्या आहेत. तापमानात वाढ झाल्याने भर उन्हात दुपारच्या दरम्यान रस्त्यावरील रहदारीही बऱयापैकी कमी झाली आहे. दिवसागणिक वाढणाऱया तापमानामुळे नागरिक हैराण झाले आहेत. यामुळे वातानुकूलित यंत्रणांच्या मागणीत ही वाढ झाली आहे. सोमवारी सरासरी तपमान 36 अंश इतके होते.

Advertisements

 यंदा तापमान वाढ अधिक प्रमाणात असल्याचे हवामान खात्याने अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे सध्या दिवसेंदिवस सरासरी तपामानात वाढ होत आहे. गेल्या आठवडय़ापासून सकाळपासून उष्मात हळूहळू वाढ होत असून दुपारच्यावेळेत नागरिकांना उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत. त्यामुळे दुपारच्या वेळेत थंडपेयांना देखिल मागणी वाढत आहे.

 गेल्या वर्षी लॉकडाऊन असल्यामुळे सर्वजण घरीच होते. त्यामुळे उन्हाचा तडाखा बसला नाही. आता मात्र परिस्थिती सुरळीत असल्याने नागरिकांना मार्चमध्येच उन्हाचा तडाख अधिक तिव्रतेने जाणवत आहे. या उन्हापासून संरक्षण व्हावे याकरीता नागरिक टोप्या, छत्र्या, गॉगल्सचा वापर करू लागले आहेत. तसेच शरिराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी अननस, मोसंबी, टरबूज, कोकम ससरबत, लिंबू पाणी, उसाचा रस, आयस्क्रिम, ज्युस यासरख्या शीतपेयांकडे नागरिकोची पावले वळत आहेत.

Related Stories

…अन्यथा आम्हाला विष पिऊन मरू द्या : खा. उदयनराजे

datta jadhav

उस्मानाबाद जिल्ह्यात लॉकडाऊन वाढला – जिल्हाधिकारी

Abhijeet Shinde

कामे वेळेत अन् दर्जेदार हवीत

Patil_p

सातारा : संगम माहुली येथे बोलेरो गाडीने तीन दुचाकींना उडवले

datta jadhav

वर्ध्यात कार अपघातात आमदारपुत्रासह 7 विद्यार्थ्यांचा मृत्यू

datta jadhav

सातारा : पालिकेच्या अतिक्रमण विभागाने मटक्याची टपरी हटवली

datta jadhav
error: Content is protected !!