तरुण भारत

यवतेश्वर परिसरात मानवी सांगडा सापडल्याने खळबळ

प्रतिनिधी/ सातारा

सातारा ते कास रस्त्यावर गणेश खिंडीनजिक असलेल्या एका रिसॉर्टपासून पुढे दीड किलोमीटर अंतरावर यवतेश्वर गावच्या हद्दीतील बांबर नावाच्या शिवारात मानवी सांगडा सापडल्याचे समोर आल्याने एकच खळबळ उडाली. ही घटना समजताच सातारा तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱयांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा करुन तपास सुरु केला. त्याच परिसरातील मुनावळे गावातील एकजण बेपत्ता असून कदाचित त्याचा हा मृतदेह असू शकतो, अशा शक्यतेपर्यंत पोलीस पोहोचले आहेत.

Advertisements

कास रस्त्यावरील यवतेश्वर परिसरात गणेश खिंडीच्या अलिकडे असलेल्या एका रिसॉर्टपासून दीड कि. मी. अंतरावर निर्जनस्थळी सोमवारी एक मानवी कवटी, हाडे तसेच जळालेल्या अवस्थेत बूट सापडला. ही घटना समजताच परिसरात एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. निर्जनस्थळी कवटी, हाडे व इतर वस्तु पोलिसांना आढळून आल्या.

दुपारी उशिरापर्यंत पंचनामा सुरू होता. दरम्यान, परिसरात अनेक ठिकाणी राख दिसत असून तेथे वणवा लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलीस सर्व शक्यता तपासत होते. परिसरातील गावांमध्येही चौकशी सुरु करण्यात आली असून यापैकी मुनावळे गावातील एक दारुच्या व्यसनाधीन असलेली व्यक्ती बेपत्ता असल्याचे समोर आले आहे. मात्र, हा मृतदेह नेमका त्याचाच असेल का या कयासापर्यंत पोलीस अद्याप पोहोचलेले नाहीत.

कवठी, हाडे व इतर वस्तू ज्या ठिकाणी पडलेल्या होत्या. तिथेच एक मोबाईलही जळालेल्या अवस्थेत मिळून आला. त्याच्या आतील बॉडीवर जो क्रमांक असतो त्यानुसार तपास सुरु केला. त्यावेळी तो क्रमांक वापरत असल्याचे नाव समोर आले. त्या नावानुसार तपास केला असता संबंधिताने तो क्रमांक त्याचा चुलत भाऊ असलेल्या संतोष पांडुरंग भोसले (रा. मुनावळे, ता. जावली) याला वापरण्यास दिला होता. संतोष भोसले यास दारुचे व्यसन होते.

बऱयाच वेळा तो दारुच्या नशेत घराबाहेर निघून जायचा. त्याच्या घरात त्याचे वृध्द आई, वडिल आहेत. गेल्या काही महिन्यापासून तो बेपत्ता असल्याचे समोर येत आहे. त्यानुसार तो मृतदेह संतोष भोसले याचाच असावा असा कयास व्यक्त केला जात आहे. मात्र, याबाबतच डीएनए अहवाल आल्यानंतरच ठामपणे पोलीस याबाबत सांगू शकतील. मात्र, अशाप्रकारे निर्जन ठिकाणी सांगडा सापडल्याने खळबळ उडाली असून अडीच महिन्यापूर्वीची ही घटना असावी, असा तपास यंत्रणांचा अंदाज आहे. अनोळखीचा मृतदेह सापडल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Related Stories

नगरपालिकेच्या खुल्या भुखंडावर अतिक्रमण

Patil_p

सातारा : अतीत येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांची कारवाई

Abhijeet Shinde

”पात्रतेपेक्षा जास्त मिळालं की असं होतं,” पडळकरांना बाळासाहेब थोरातांच्या लेकीने दिलं उत्तर

Abhijeet Shinde

शहापूर योजनेचा पाणी पुरवठा बंद राहणार

datta jadhav

कोरोना पॉझिटिव्ह वृद्धेचा सातारा-कोल्हापूर प्रवास!

Abhijeet Shinde

सातारा : गेल्या तीन महिन्यापासून कडेगावात ‘देवमाणूस’ मुक्कामी

Abhijeet Shinde
error: Content is protected !!