तरुण भारत

पणजीत 17 रोजीपासून विज्ञान चित्रपट महोत्सव

प्रतिनिधी / पणजी

दरवर्षीप्रमाणे विद्यार्थ्यांमधील विज्ञान संकल्पनांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने विज्ञान परिषद गोवातर्फे बुधवार दि. 17 व गुरूवार दि. 18 रोजी दोन दिवशीय भारतीय विज्ञान चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 17 रोजी सकाळी 10 वा. आयनॉक्स 1 मध्ये मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याहस्ते महोत्सवाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. सदर महोत्सवात विज्ञानावर आधारित चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. तसेच तज्ञ आणि शास्त्रज्ञांसह चर्चा आणि परस्पर सत्रांचा समावेश आहे. याशिवाय या महोत्सवात अभिनव प्रदर्शनाचे आकर्षण राहणार असल्याची माहिती विज्ञान परिषदेचे संचालक सुहास गोडसे यांनी पणजीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी एनआयओचे संचालक डॉ.सुनील कुमार सिंग, विज्ञान प्रसारचे निमिश कपूर उपस्थित होते.

Advertisements

यंदाच्या महोत्सवात गर्दी होऊ नये यासाठी प्रतिनिधींची व विद्यार्थ्यांची संख्या मर्यादित ठेवण्यात आली आहे. अभिनव प्रदर्शन हे या उत्सवाचे सर्वात मोठे आकर्षण असणार आहे. या प्रदर्शनात प्रदर्शित असलेल्या वर्किंग मॉडेल्सच्या माध्यमातून सहभागी झालेल्या लोकांना तंत्रज्ञानाच्या आकर्षक जगाविषयी जाणून घेता आणि ज्ञान प्राप्त करता येईल. याव्यतिरिक्त विज्ञान प्रसार आणि विज्ञान परिषद यांनी विज्ञान, आरोग्य आणि पर्यावरणविषयक वृत्तांत लिहिण्याच्या तंत्रास प्रोत्साहित करण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी पत्रकार आणि संपादकांसाठी आज दि. 16 रोजी एक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर अभिनव प्रदर्शनाचे उद्घाटन होईल अशी माहिती गोडसे यांनी दिली.

पत्रकार आणि संपादकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेत विज्ञानावर आधारित बातम्या, संदर्भ कसे लिहावेत याविषयी तज्ञांतर्फे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. याचबरोबर दि. 17 व 18 रोजी विज्ञानावर आधारित चित्रपटनिर्मिती कार्यशाळा आयोजित करण्यात आली असल्याची माहिती निमिश कपूर यांनी दिली.

या दोन दिवसांमध्ये विज्ञान विषयावर असलेल्या चित्रपटांचा समावेश असून त्यावर भारतीय प्रख्यात शास्त्रज्ञ संवाद व स्पष्टीकरण देतील. टेनेट, दी लास्ट मिम्झी, टिकटिकटिक आणि स्फीअर हे चित्रपट प्रदर्शित होतील असे गोडसे यांनी सांगितले.

 या कार्यशाळेच्या माध्यमातून विज्ञानामध्ये रूची वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. विज्ञान क्षेत्रात आम्ही पाहिजे तेवढे पुढे गेलेलो नाही. अजूनही थोडेफार विकासाची गरज आहे. विज्ञानात आत्मनिर्भरता आणण्यासाठी विज्ञानावर आधारित उपक्रम आयोजित करणे गरजेचे आहे असे डॉ. सुनील कुमार सिंग यांनी यावेळी सांगितले.

Related Stories

पेडणे तालुक्यातील चारही मतदारसंघात 70 टक्केपेक्षा कमी मतदान

Patil_p

मोटारसायकलवरून विहिरीत पडलेल्या पोलिसाला जीवदान

Omkar B

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 454 वर

tarunbharat

गोवा डेअरीचे 2 ऑक्टो रोजी सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण

Patil_p

सत्तरी तालुक्मयातील कोवीड रुग्णांची संख्या 27

Patil_p

पस्तीसपैकी नऊ मतदारसंघात भाजपला बंडखोरीचा धोका

Amit Kulkarni
error: Content is protected !!