तरुण भारत

‘एक मनोहर कथा’ पुस्तकाचे उद्या प्रकाशन

प्रतिनिधी / पणजी

गोव्याचे माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय मंत्री मनोहर पर्रीकर यांच्या जीवनावरील ‘एक मनोहर कथा’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा बुधवार दि. 17 मार्च रोजी सकाळी 10 वा. पणजी येथील इन्स्टिटय़ूट मिनेझिस ब्रागांझा हॉलमध्ये आयोजित करण्यात आला आहे.

Advertisements

सुप्रसिद्ध लेखिका व निवेदिका मंगला खाडीलकर यांनी ते पुस्तक लिहिले असून त्यांनीच पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत वरील माहिती दिली. गेली 3 ते 4 वर्षे या पुस्तकाचे लेखन चालू होते, असे सांगून त्या म्हणाल्या की, पुस्तकाची पाने 367 व किंमत रु. 630 एवढी असून प्रकाशनाच्या दिवशी या पुस्तकाची किंमत रु. 440 ठेवण्यात आली आहे. नंतरही त्याची किंमत रु. 500 पर्यंतच मर्यादित ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले. सदर पुस्तक मराठीत असून कोकणी व इतर भाषांत त्याचा अनुवाद करण्याचा बेत आहे. या पुस्तकाला कसा काय प्रतिसाद मिळतो त्यावरच ते अवलंबून रहाणार असल्याचे त्यांनी सांगितले. नवचैतन्य प्रकाशनतर्फे हे पुस्तक प्रकाशित होणार असून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे त्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी मुख्य पाहुणे म्हणून उपस्थित रहाणार आहेत, असे सांगण्यात आले. पत्रकार परिषदेला भाजप प्रदेश अध्यक्ष सदानंद तानावडे, संजीव देसाई, गोरख मांद्रेकर उपस्थित होत.

Related Stories

आग्नेल, जोसेफ, अँथोनी यांचा तृणमूलमध्ये प्रवेश

Amit Kulkarni

‘जिहाद’शी संबंध ठेवणाऱयांची गय नाही

Amit Kulkarni

अर्थसंकल्प विभागाचे माजी संयुक्त सचिव आनंद शेरखाने यांचे निधन

Amit Kulkarni

रोजगार हमीची माहिती तळागाळापर्यंत

Omkar B

श्रीस्थळचा वार्षिक भजनी सप्ताह 1 ऑगस्ट पासून सुरू

Amit Kulkarni

‘लॉकडाऊन’मध्ये पोलिसांकडून 40 लाखांचा दंड वसूल

Omkar B
error: Content is protected !!