तरुण भारत

राज्य निवडणूक आयुक्तपदास नारायण नवती यांचा नकार

पाच पालिकांच्या निवडणुकांचे कार्य अधांतरी : आयुक्तपदासाठी नव्या व्यक्तीचा शोध जारी

प्रतिनिधी / पणजी

Advertisements

राज्य निवडणूक आयुक्तपद स्विकारण्यास नारायण नावती यांनी नकार दिला असून तसे सरकारला कळवले आहे. आपली त्या पदावर नियुक्ती करू नये, असेही त्यांनी सुचित केले आहे. आयुक्तपदासाठी 20 वर्षाची नागरी सेवा आवश्यक असून आपली सेवा 18 वर्षाची असल्याचे नावती यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

 नावती यांनी नकार दिल्यामुळे सरकारवर आता पुन्हा एकदा नव्याने आयुक्त शोधण्याची पाळी आली आहे. अलिकडच्या काळात सरकारचे बहुतेक निर्णय अतिघाईने होत असल्याचे दिसून येत आहे. अशा निर्णयांमुळे सरकारच्या प्रतिमेवरही बराच परिणाम होत आहे.

 पाच पालिकांच्या निवडणुकांचे कार्य अधांतरी

 दरम्यान आयोगावर आयुक्त नसल्यामुळे 5 पालिकांमधील नव्याने वॉर्ड आरक्षण व निवडणूक कार्यक्रम निश्चित करण्याचे काम अधांतरी राहीले असून ते केव्हा होणार याकडे संबंधितांचे लक्ष लागून राहीले आहे.

आधीचे आयुक्त चोखाराम गर्ग यांनी राजीनामा दिल्यानंतर सरकारने त्यांच्या जागी नावती यांची नियुक्ती केली आणि राज्यपालांनी त्यांच्या नावास मान्यताही दिली होती. सुरूवातीला ते पद स्विकारण्यास तयार असल्याचे निवेदन नावती यांनी केले होते.

नावतींच्या सेवाकाळाविषयी प्रश्न

मात्र नंतर काहीजणांनी त्यांच्या एकंदरीत वर्षाबाबत (सेवा) प्रश्न उपस्थिती केले आणि सरकारला त्याबाबत विचारणा केली. तेव्हा त्यांची नियुक्ती पुढे वादग्रस्त होण्याची चिन्हे दिसू लागली म्हणून शेवटी नावती यांनी स्वतःहून त्या प्रकरणातून अंग काढून घेतले आणि ते पद स्विकारण्यास नकार दर्शवला. त्यासाठी त्यांनी योग्य तो खुलासाही केला आहे.

Related Stories

महापौर, उपमहापौर निवडणूक उद्या

Patil_p

सिनेमा शूटिंगचा स्थानिक, व्यापाऱयांना त्रास

Amit Kulkarni

हॉटेल, शॉपिंग मॉल, रिसॉर्ट आजपासून खुली

Omkar B

भाजप उमेदवारांविरोधात मतदान करा – गिरीश चोडणकर.

Amit Kulkarni

मडगाव पालिकेवर यंदा भाजपचा झेंडा : मुख्यमंत्री

Amit Kulkarni

कोरोना योद्धांच्या कार्यामुळे गोवा पर्यटकांसाठी सुरक्षित राज्य

Patil_p
error: Content is protected !!