तरुण भारत

कोरोनामुळे शाळा पडली बंद; शिक्षकाने सुरू केला गांजा तस्करीचा व्यवसाय

ऑनलाईन टीम / नागपूर :

नागपूरच्या बेलतरोडी पोलिस स्टेशन अंतर्गत हैद्राबादेतून दिल्लीला जाणारा 91 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे गांजा तस्करी करणारा एक शिक्षक निघाला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

Advertisements

मिळालेल्या माहितीनुसार, शिवशंकर इसमपल्ली असे अटक करण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव आहे. लॉकडाऊनमुळे हैदराबादमध्ये त्याची शाळा बंद झाल्याने त्याने गांजा तस्करी सुरू केला असे पोलिसांना सांगितले आहे. तो मूळचा हैदराबादचा राहणारा आहे. नागपूर पोलिसांना हैद्राबादहून नागपूरमार्गे दिल्लीला गांजाची मोठी खेप जात असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसानी वर्धा मार्गावर सापळा रचून DL-4c-AD-3665 या क्रमांकाच्या गाडीला थांबवून झडती घेतली. या गाडीत मोठ्या प्रमाणात गांजा सापडला.

या कारवाई दरम्यान पोलिसांनी सुमारे 13 लाख रुपये किंमतीचा 91 किलोचा गांजा जप्त केला आहे.आता या प्रकरणाचा नागपूर पोलीस अधिक तपास करत आहेत. या मागे काही रॅकेट आहे का याचाही तपास सुरू आहे.

Related Stories

सातारा : आज १४ जणांना डिस्चार्ज, ४३९ जणांचे नमुने पाठविले तपासणीला

Abhijeet Shinde

यशवंत डांगे यांची बदली रद्द करा

Patil_p

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कर्ज काढण्याशिवाय पर्याय नाही : शरद पवार

Rohan_P

दिल्ली : कोरोनामुळे पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू

Rohan_P

मराठा आरक्षण रद्द : पुण्यात मराठा कार्यकर्त्यांचे आंदोलन 

Rohan_P

महाराष्ट्रात 23,816 नवे कोरोना रुग्ण; 325 जणांचा मृत्यू

Rohan_P
error: Content is protected !!